Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी वाढ दिसून आली. सोयाबीनच्या भावात कालपासून काहीशी वाढ झाली आहे. काल प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव १५० ते २०० रुपयांनी वाढवले होते. आजही भावात १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सोयाबीन खरेदीचा भाव ७ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपये भाव मिळत आहे. बियाणे दर्जाचे सोयाबीन ८ ते ९ हजाराने विकले जात आहे. सोयाबीनच्या भावातील सुधारणा आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस टिकूनदेशातील बाजारात कापसाच्या भावातील तेजी कायम आहे. कापसाच्या भावात मागील आठवड्यात काहीशी नरमाई आल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा दिसून आली. भाव पुन्हा ९ हजारांच्या दरम्यान पोचले आहेत. सीसीआयची कापूस विक्रीही चांगल्या प्रमाणात सुरु आहे. सीसीआयकडेच सध्या सर्वाधिक साठा आहे. त्यामुळे सीसीआयच्या विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. कापूस आणि सुताची निर्यातही चांगली सुरु असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. मात्र भाव वाढल्याने मागणी स्थिरावलेली आहे. याचाही परिणाम दरावर दिसत आहे. कापूस बाजारातील ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Fuel Hike: पेट्रोल, डिझेल दरवाढीचा पुन्हा एकदा झटका; लिटरमागे ९० पैशांपर्यंत वाढ.कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावात आहे. कांद्याला मागील दोन महिन्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. वाढत्या उन्हामुळे कांदा साठवणुकीत अडचणी येत आहेत. कांदा सडण्याचे प्रमाणही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे कांद्याचा प्रश्न आणखी बिकट झाला आहे. कांदा बाजारावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Pulses Price Hike: डिझेल दरवाढीने डाळींचे दर कडाडले.हळद स्थिरराज्यातील बाजारात हळदीची आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. आवकेचा दबाव काही प्रमाणात काही बाजारांमध्ये कमी दिसत आहे. याचा दराला आधार मिळत असून हळदीचा भाव स्थिरावलेला दिसत आहे. हळदीला मागणी चांगली आहे तर उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या बाजारात हळदीला प्रतिक्विंटल सरासरी १२ हजार ते १४ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हळदीची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या भावातही सुधारणेचे संकेत आहेत, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..हरभरा स्थिरदेशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहे. हरभऱ्याच्या सरासरी भावात काहीशी सुधारणा दिसत असली तरी भावातळी हमीभावाच्या खालीच आहे. हमीभावाने हरभरा खरेदी उद्दीष्ट पूर्ण झाल्यामुळे थांबली आहे. याचा परिणाम हरभरा दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात हरभरा प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभरा बाजारातील आवक सध्याही चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर दिसून येत आहे. हरभरा दरावरील दबाव पुढील काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.