Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation : इको बटालियनच्यावतीने ३१ हजार वृक्ष लागवड

Environment Day : पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत व शहर हद्दीतही वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : पर्यावरण दिनाचा मुहूर्त साधून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत व शहर हद्दीतही वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली. जटवाडा, रहाळ, पट्टीतांडा येथे वन विभाग, १३६ इको बटालियन यांच्यावतीने ३१ हजार वृक्ष लागवड करण्यात आली.

या उपक्रमात गायत्री परिवार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, एनसीसी आदी सहभागी झाले होते. सरपंच छाया चव्हाण, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, कर्नल निर्देश साहा, लेफ्ट. कर्नल अमित प्रभू, मेजर अनिरुद्ध काळे, मेजर प्रमोद बहिरथ, मेजर चंद्रमा सिंग, विष्णू बढिया, तहसिलदार रमेश मुनलोड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा प्रारंभ करण्यात आला. वन विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या क्षेत्रावर इको बटालियन तर्फे ३ लाख वृक्ष लागवड करण्यात येत असून त्याचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी ३१ हजार वृक्ष लागवड करण्यात आली, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

शुद्ध हवा, शुद्ध पाणी जे जगण्यासाठी नितांत आवश्यक आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. पैसा, प्रॉपर्टी, मालमत्ता आपल्या मुलांसाठी मागे ठेवतांना त्यांच्यासाठी शुद्ध हवा, पाणी यांचीही तरतूद करुन ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्ष लावा, वृक्ष जगवा म्हणजेच माणूस जगेल.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT