Chandrashekhar Bawankule On Talathi Recruitment: तलाठी भरतीत महसूल सेवक म्हणजेच कोतवालांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तलाठ्यांच्या जागा भरताना किमान २० टक्के आरक्षण हे महसूल सेवकाला द्या, अशी महसूल सेवकांची मागणी आहे. ही मागणी मान्य करण्याबाबत सरकार विचार करत आहे, असे महसूलमंत्र्यांनी म्हटले आहे..ते रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होते. महसूल सेवकांच्या मागणीवर विचार करताना तलाठ्याचे नियक्त्यांच्या आरआरमध्ये तसेच सेवा- शर्ती नियमांमध्ये बदल करावे लागतील. ते आम्ही करु. जे अनुभवी महसूल सेवक आहेत; त्यांना तलाठ्याच्या जागेवर नव्या नियुक्त्या करताना संधी देता येईल, असेही बाबनकुळे म्हणाले..Forest Right Land: वनहक्क जमिनींना स्वतंत्र सातबारा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा.राज्यातील महसूल सेवकांना तलाठी भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन याआधीही सरकारकडून देण्यात आले होते. महसूल सेवकांचा चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा. त्यांना मानधन देण्याऐवजी वेतनश्रेणी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल सेवकांना तलाठी भरतीत आरक्षण देणे. त्यासाठी पाच वर्षांचा अनुभव आणि २५ अतिरिक्त गुण देण्याचा प्रस्तावही याआधी मांडण्यात आला होता. .Satbara Ferfar Scam: ७/१२ उताऱ्यांत बेकायदेशीर फेरफार, शेतकऱ्यांची मोठी फसवणूक; ४२४ प्रकरणे उघडकीस- बावनकुळे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदांच्या १ हजार ५३९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अशी शैक्षणिक पात्रता आहे. .रायगडचा पालकमंत्री कोण? रायगडचा पालकमंत्री कोण? याबाबतही मंत्री बावनकुळे यांनी महत्त्वाचा खुलासा केला. रायगडचा पालकमंत्री कुणाला करायचं? हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून याबद्दलचा निर्णय घेतील. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. .'ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करु'ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून आजपासून राज्यभरात मंडल यात्रा २०२६ सुरु करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने आतापर्यंत नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या असतील तर आम्ही पूर्ण करु. त्यांना काही अतिरिक्त सवलती पाहिजे आहेत. त्यासुद्धा पूर्ण करण्याचा सरकार विचार करेल, अशीही माहिती महसूलमंत्र्यांनी दिली. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.