Monsoon Farming : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने रखडलेल्या धान रोवणीला जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे चांगलाच वेग आला. जिल्ह्यात यंदा नियोजित १ लाख ६८ हजार १०१ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २ हजार २९३ हेक्टरवर धानाची रोवणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामाला दिलासा मिळाला असला, तरी काही भागात अतिवृष्टीमुळे पाणीसाचून पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे..जूनमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी रोपवाटिका तयार असूनही रोवणी रखडली होती. त्यामुळे खरीप हंगामाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने सातत्य राखल्याने शेतशिवारात पुरेसे पाणी उपलब्ध झाले आणि शेतकऱ्यांनी युद्धपातळीवर रोवणीची कामे हाती घेतली. ग्रामीण भागात रोवणीच्या कामांना वेग आला असून मजुरांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे..Kharif Sowing: गतवर्षी जादा पाऊस, यंदा कमालीची ओढ.जिल्ह्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या १३८ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धानपिकाच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले असून, आगामी काही दिवस पावसाची साथ कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरील रोवणीही नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे..Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’.अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनीत धानपीक पाण्याखालीअर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. शुक्रवारी (ता. ३१ जुलै) पावसाचा जोर कायम होता तर शनिवारी (ता. एक) पावसाने उघडीप दिली. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने धानपिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रोवणी केलेले पीक आडवे पडले असून पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास पिके सडण्याची भीती व्यक्त होत आहे. माहूरकुडा परिसरातील नाल्यालगतच्या शेतांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे..साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांना फटकाअर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यांतील मुसळधार पावसामुळे सुमारे साडेआठ हजार हेक्टरवरील धानपीक पाण्याखाली आले आहे. बाधित क्षेत्राची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून पाणी ओसरल्यानंतर नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.