Tree Plantation : शेतकऱ्याने पत्नीची आठवण जपत केली एक हजार अकरा रोपे लागवड

Indian Agriculture : तरडगाव (ता. जामखेड) येथील प्रगतिशील शेतकरी तथा सेवानिवृत्त शिक्षक विष्णूपंत सानप यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आठवण जपत एक हजार आकरा वॄक्षांची लागवड केली.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon
Published on
Updated on

Ahillyanagar News : तरडगाव (ता. जामखेड) येथील प्रगतिशील शेतकरी तथा सेवानिवृत्त शिक्षक विष्णूपंत सानप यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आठवण जपत एक हजार आकरा वॄक्षांची लागवड केली. मान्यवरांच्या हस्ते लागवड केलेल्या वॄक्षांचे पूजन करण्यात आले.

तरडगाव (ता. जामखेड) येथील प्रगतिशील शेतकरी तथा सेवानिवृत्त शिक्षक विष्णूपंत सानप यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते वसंत सानप यांच्या आई शहाबाई सानप यांचे श्वसनाच्या आजाराने वर्षभरापूर्वी निधन झाले.

Indian Agriculture
Tree Plantation : शेताच्या बांधावर कोणती झाडे लावाल?

तब्बल दोन वर्षे त्यांना हा त्रास मोठ्या प्रमाणात झाला. शेवटचे ४५ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर काढावे लागले. विष्णूपंत सानप आणि शहाबाई सानप यांनी २००६ पासून २०२१ पर्यंत १५ वर्षांच्या काळात २५०० हजार फळझाडांची लागवड केली.

एवढेच नाही तर त्यांनी तेथेच वास्तव्यही केले. शहाबाई यांचे जन्मतःच फुफ्फुस केवळ ३० टक्के काम करीत होते. अन्य शारीरिक व्याधीही पाठीशी होत्या. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा संकल्प या दांपत्याने केला. त्यामुळेच शहाबाईंना वयाची सत्तरी ओलांडता आली.

Indian Agriculture
Tree Plantation : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ उपक्रमातून होणार वृक्षलागवड

निधनानंतर त्यांचा अंत्यविधी त्यांनी लावलेल्या आंब्याच्या शेतात करण्यात आला. सानप परिवाराने रक्षा विसर्जित न करता शेतात खड्डे घेऊन त्यात टाकली. एवढ्यावर न थांबता त्याठिकाणी विष्णूपंत व वसंत या पिता-पुत्रांनी रक्षा टाकलेल्या ठिकाणी नवीन फळझाडांची लागवड करण्याचा संकल्प सोडला.

याकरिता तब्बल १०११ खड्डे घेतले. या खड्ड्यांमध्ये रक्षा टाकून त्यामध्ये १००० आंब्याच्या झाडांची व ११ नारळाच्या झाडांची रोपेलागवड केली. नुकतीच शहाबाई यांच्या प्रथम स्मृतीदिनी सानप कुटुंबातील सदस्यांनी या झाडांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन केले. विकास महाराज वायसे, गायत्री मंदिराचे महंत महादेव महाराज सानप, आमदार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com