E-Gorge Katta Agrowon
ॲग्रो विशेष

E-Gorge Katta : ‘ई-गोरज कट्टा’ ‘हाउस फुल्ल’; परभणी पशुवैद्यक आणि पशू विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम

Veterinary Colleges : परभणी येथील पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सायंकाळी पशुपालकांची बैठक घेतली जाते. या बैठकीत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.

Team Agrowon

Solapur news : परभणी येथील पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयाने सुरू केलेल्या ‘ई-गोरज कट्ट्या’वर आता ‘हाउस फुल्ल’चा बोर्ड लागला आहे. या माध्यमातून पशू व्यवस्थापनावर सखोल चर्चा होत आहे. त्यामुळे पशुपालकांना तांत्रिक व शास्त्रीय माहिती मिळण्याचे हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.

कोरोनाच्या काळात पशुधनाचे आरोग्य अबाधित ठेवता यावे, या हेतूने या महाविद्यालयाचे तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय यांच्या संकल्पनेतून राज्यातील पशुपालकांसाठी ‘ई-गोरज कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला. हा उपक्रम www.google.meet/ hnj-iqcu-ama या लिंकवर ई-गोरज कट्टा नावाने सुरू आहे. त्यावर दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी सायंकाळी साडेसात ते रात्री साडेआठ वाजेदरम्यान सुमारे तासभर पशुपालकांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

या कट्यावर परभणी येथील पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालयातील वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ मंडळी असतात. ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला उत्तरे देतात. पशुपालकांच्या भागातील सरकारी पशुवैद्यक दवाखान्यातील डॉक्टरांशी त्यांचा संपर्क करून दिला जातो. त्यामुळे संबंधित पशुपालकांना पशुधनावरील उपचारासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकांची मदत मिळते. पशुधनावर योग्य व तातडीने उपचार होतात. त्यामुळे या कट्ट्यावर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
गुरुवारी (ता.१०) या कट्यावर अपेक्षेपेक्षाही जास्त पशुपालकांची गर्दी झाली. तज्ज्ञांना वेळेअभावी सगळ्याच पशुपालकांचे प्रश्‍न सोडवता आले नाहीत. हा कट्टा आता ‘हाउस फुल्ल’ झाला आहे.


पशुपालकांना डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. सुनित वानखेडे, डॉ. सुहास अमृतकर, डॉ. मीरा साखरे, डॉ. विठ्ठल मुंडे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. शरद चेपटे, डॉ. सुधीर राजूरकर, डॉ. संदीप रिंधे, डॉ. अनिता चप्पलवार, डॉ. म्हाळसाकांत निकम, डॉ. काकासाहेब खोसे, डॉ. पंडित नांदेडकर, डॉ. सुधीर बोरीकर, डॉ. मकरंद खरवडकर, डॉ. बाबासाहेब नारलदकर, डॉ. पंडित नांदेडकर यांचे मार्गदर्शन मिळते.

पशुपालकांना त्यांच्या पशुधनासाठी विद्यापीठ स्थरावर झालेले नवीन संशोधन व आमची स्थानिक प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टींचा चांगला फायदा होत आहे.
– डॉ. उमाकांत बोर्डे, पशुधन विकास अधिकारी,पशुवैद्यकीय दवाखाना, रोपळे बुद्रुक
ई-गोरज कट्ट्यावर पशुधनाबाबात चांगली माहिती मिळते. त्यामुळे पशू व्यवस्थापनावरील खर्च फार कमी झाला. उत्पन्नवाढीस मदत झाली.
यासीन खान, पशुपालक, लवूळ, ता. माढा, जि. सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bank Representative Crisis: राज्यभरात ८० हजार बॅंक प्रतिनिधींनी कामे सोडली

Farmer Income Crisis: सरलेले वर्ष शेतीसाठी निराशाजनक

Greece Farmers Protest: ग्रीसमध्ये शेतकरी आंदोलनाचा भडका; प्रमुख महामार्ग बंद

Fake Seeds Control: बोगस बियाण्यावर नियंत्रण येणार

Irpundi Village: गडचिरोलीत एकाच घराचे गाव

SCROLL FOR NEXT