Gadchiroli News: आपण गावाची कल्पना करतो तेव्हा नजरेसमोर काय येते... २० किंवा २५ घरे, ग्रामपंचायत, अंगणवाडी, मध्यवर्ती ठिकाणी एखादे देऊळ, रस्त्यावर ये-जा करणारी गुरे-ढोरे असे काहीसे चित्र आपल्या मनात असते. पण गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात इरपुंडी नावाचे एक गाव आहे. या गावात फक्त एकच घर आहे. .विशेष म्हणजे २०११ ला झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद आहे. इरपुंडीत चार पुरुष आणि दोन महिला असे मिळून ६ लोक असल्याची नोंद आहे. गडचिरोलीतील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी एज्युकेशन (सर्च) या संस्थेने धानोरा तालुक्यातील २३० गावांत २०२४-२०२५ मध्ये केलेल्या जनगणनेमध्ये इरपुंडीतील लोकसंख्या ९ असल्याचे नोंदविले आहे..Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा .ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग संस्थापक असलेल्या ‘सर्च’ संस्थेचे संख्याशास्त्र विभाग संशोधन कार्यासाठी धानोरा तालुक्यात जनगणना करत असते. हे गाव गडचिरोली शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर आहे..Rural Innovation: माती, बियाणे आणि माणूस .तर इरपुंडीपासून सर्वांत जवळचे मोठे गाव तुकुम हे पाच किलोमीटर अंतरावर आहे. तुकुमपासून डांबरी रस्ता जातो. जंगलातून जाणाऱ्या या रस्त्यावर जवळपास अर्धा किलोमीटर इतका कच्चा रस्ता आहे. तेथून पुढे झाडे यांच्या घरी जाण्यासाठी काँक्रीटचा रस्ता करण्यात आला आहे..यशोदा झाडे (वय ६०) या कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत ३ मुले, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. तर एक मुलगा आणि त्याची पत्नी अन्यत्र राहात आहेत. पतीच्या निधनानंतर कष्टाने संसार चालविल्याचे यशोदा झाडे सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.