Veterinary Medicine College : पशुवैद्यक क्षेत्रातील संधी आणि राज्यातील महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया

Veterinarian : पशू दवाखान्याच्या बरोबरीने रोगनिदान केंद्र, कुक्कुटपालन प्रक्षेत्र, गोपालन प्रक्षेत्र, कृत्रिम रेतन केंद्र अशा ठिकाणी सुद्धा पशुवैद्यकांच्या नेमणुका होतात.
Veterinary Medicine College
Veterinary Medicine CollegeAgrowon
Published on
Updated on

विकास कारंडे,शिवानी मुरळे

Veterinarian Education : बारावी सायन्स नंतर कोणते करिअर निवडायचे हा विद्यार्थी व पालकांसाठी मोठा प्रश्न असतो, कारण १२ वी नंतर निवडलेले क्षेत्र हे आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरते.त्यादृष्टीने पशुवैद्यकीय क्षेत्र चांगली संधी आहे.

आपण जेव्हा पशुवैद्यकाचा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर साधारणत: एक प्रतिमा येते ती म्हणजे जनावरांचा डॉक्टर, परंतु या क्षेत्राची व्याप्ती त्याहीपेक्षा खूप जास्त आहे. तसेच यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत.

या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या, नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. गोपालन, शेळी- मेंढी पालन आणि कुक्कुटपालन याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. पशुवैद्यक शास्त्र हे अतिशय विस्तृत शास्त्र आहे. पदवीधरांना सरकारी खाते,सहकार खाते, खासगी क्षेत्रामध्ये नोकरीसह व्यवसायाच्या ही अनेक संधी उपलब्ध आहेत.

उदा. महाराष्ट्र शासनातर्फे पशुधनाची निगा राखण्यासाठी आणि दुग्धव्यवसायासाठी पशुवैद्यकांच्या नेमणुका केल्या जातात. या नेमणुका वर्ग -१ या राजपत्रित अधिकारी वर्गामध्ये केल्या जातात आणि त्यांचा हुद्दा पशुधन विकास अधिकारी ( LDO ) म्हणून आहे.

पशू दवाखान्याच्या बरोबरीने रोगनिदान केंद्र, कुक्कुटपालन प्रक्षेत्र, गोपालन प्रक्षेत्र, कृत्रिम रेतन केंद्र अशा ठिकाणी सुद्धा पशुवैद्यकांच्या नेमणुका होतात.

Veterinary Medicine College
Chicken Festival : पशुवैद्यक, पशुविज्ञान महाविद्यालयात ‘चिकन महोत्सव’

१) केंद्र शासनाचे विविध उपक्रम आहेत. यामध्ये पशुवैद्यकांना संधी आहेत. केंद्रशासनाच्या अखत्यारित देखील गोपालन, कुक्कुटपालन, वराहपालन किंवा शेळी मेंढी पालन यासारखी प्रक्षेत्र आहेत, तसेच वन्य प्राणी-पक्षी आहेत.

राष्ट्रीय प्राणी संग्रहालयामध्ये पशुवैद्यकांना बऱ्याच संधी आहेत. भारतीय लष्करामध्येही पशुवैद्यकांच्या नेमणुका केल्या जातात; ही नेमणूक कॅप्टन या पदावर असते, जी ५ वर्षे कालावधीसाठी असते. त्यानंतर कामगिरीनुसार कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते.

२) पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उच्चशिक्षित पशुवैद्यकांची अध्यापनासाठी गरज लागते; त्यानंतर बॅंक, विमा क्षेत्र यामध्ये पशुवैद्यकाची गरज लागते. दूध प्रक्रिया संघामध्येही पशुवैद्यकांची गरज असते.

खासगी क्षेत्राचा विचार केला पशू औषधनिर्मिती, लसनिर्मिती, पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्या तसेच वेगवेगळे संशोधन करणाऱ्या कंपन्या आहेत; अशा प्रत्येक ठिकाणी पशुवैद्यकाची गरज असते.पशुधन उत्पादक उद्योगामध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी पशुवैद्यक लागतो.

३)शहरी भागात श्वान आणि मांजरांच्या उपचारासाठी दवाखाना सुरू करता येतो. वैयक्तिक पातळीवर गोपालन, शेळी -मेंढी पालन, कुक्कुटपालन हे व्यवसायही करता येतात.

४) या व्यतिरिक्त बरेचसे पशुवैद्यक प्रशासकीय सेवेमध्ये उत्तम कार्य करताना दिसतात. यासाठी स्पर्धा परीक्षा महत्त्वाच्या ठरतात.

महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय महाविद्यालये व प्रवेश प्रक्रिया

१) महाराष्ट्रामध्ये एकूण पाच पशुवैद्यकीय महाविद्यालये आहेत. विदर्भात नागपूर, कोकण विभागातील मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील शिरवळ, मराठवाडा विभागात परभणी, उदगीर या महाविद्यालयांचा सामावेश होतो.

२) पशुवैद्यकीय पदवीसाठी प्रवेश घेण्याकरिता १२ विज्ञान शाखेत उत्तीर्ण व्हावे लागते.जीवशास्त्र, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र व इंग्रजी यामध्ये एकत्रितपणे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गासाठी ही टक्केवारी ४७.५० टक्के एवढी आहे.

३) प्रवेशप्रक्रिया ही बारावीच्या गुणव‌त्तेनुसार न होता राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) या परीक्षेच्या आधारावर होते. NEET मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्चित होतो. यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.mafsu.ac.in) जाऊन माहिती मिळवणे आवश्यक असते कारण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असते.

Veterinary Medicine College
Veterinarian Council : पशुवैद्यक परिषद दुर्लक्षितच!

४) ही पदवी ५.५ वर्षांची आहे आणि यात पहिली ४.५ वर्षे महाविद्यालयीन अभ्यासक्रम असतो. यात क्लासरूम टीचिंग, थेअरी व प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके यांचा समावेश होतो. या ४.५ वर्षे कालावधीमध्ये पशुवैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एकूण १८ विषय शिकवले जातात.

शेवटचा १ वर्ष आंतर्वासिता (Internship) कालावधी असतो, यात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्राबाहेर प्रक्षेत्रावर अनुभवासाठी वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पाठवले जाते. ५.५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना BVSc &AH ही पदवी प्रदान करण्यात येते. पदवी नंतर विद्यार्थी आपल्या आवडीनुसार पदव्युत्तर शिक्षण घेतात.

५) NEET चा निकाल लागल्यानंतर लगेचच विद्यापीठाकडून प्रवेशाविषयी नोटिफिकेशन निघते आणि सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे अर्ज भरून लागणारी कागदपत्रे अनलोड करून गुणवत्तेनुसार प्रवेश आपल्या आवडीच्या महाविद्यालयामध्ये घेता येतो.

लागणारी कागदपत्रे :

१) NEET चे मार्कशीट, बारावीचे मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, आरक्षण असल्यास गरजेप्रमाणे प्रमाणपत्र.

२) जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, इतर आरक्षण जसे की, प्रकल्पग्रस्त, फ्रीडम फायटर, अपंगत्व, इडल्बूएस अशा शासनाच्या नियमाप्रमाणे आरक्षित जागा असतात.

संपर्क : विकास कारंडे,९०२९८०२३२३, (औषधशास्त्र व विषशास्त्र, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि.सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com