Sericulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : रेशीम कोश उत्पादकांची कसरत सुरू

Silk Cocoon Production : पाण्याच्या उपलब्धतेअभावी रेशीम कोष उत्पादनावरही मर्यादा आल्या आहेत.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : पाण्याच्या उपलब्धतेअभावी रेशीम कोष उत्पादनावरही मर्यादा आल्या आहेत. दुसरीकडे ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांना रेशीम कोश उत्पादन घेताना तापमान नियंत्रणासह इतर अनेक बाबींना तोंड देण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील यंदाच्या महारेशीम अभियानाअंतर्गत ११३५ शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगासाठी नोंदणी केली आहे. नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना नर्सरीद्वारे तुती रोपनिर्मिती करणे आवश्यक आहे. पाण्याच्या अनुपलब्धतेमुळे मात्र शेतकऱ्यांना रेशीम उद्योगासाठी आवश्यक नर्सरीद्वारे तुती रोपनिर्मिती करणे शक्य झाले नाही.

त्यामुळे महारेशीम अभियानाअंतर्गत नोंदणी केलेल्या पूर्ण क्षेत्रावर तुती लागवड होईल की नाही हे तूर्त सांगणे अवघड आहे. शिवाय आधीची एक हजार एकर तुती लागवड झाली आहे. माहितीनुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोपे उपलब्ध व्हावीत म्हणून व्यावसायिक स्तरावर जवळपास पाच एकरावर तुती रोप निर्मितीसाठी नर्सरी करण्यात आली असल्याची माहिती रेशीम विभागाकडून देण्यात आली.

याशिवाय जवळपास १२५ शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याच्या भरोशावर तुती रोप निर्मितीचे काम हाती घेतले आहे. दोन्ही मिळून साधारणपणे १४ लाख ३७ हजार ५०० रोपांची निर्मिती होऊ शकते दुसरीकडे नोंदणी केलेली क्षेत्र पाहता साधारणपणे ६२ लाख ४२ हजार ५०० रोपांची गरज लागणार आहे.

ही गरज भागवण्यासाठी बीड किंवा कर्नाटकातील बेळगावमधून रोपे आणण्याची तयारी नोंदणी करून शेतकऱ्यांनी चालवली आहे. आताच्या सुरू असलेल्या रेशीम कोश उत्पादनाच्या बॅचेस एप्रिलपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर मात्र अपवाद वगळता सर्व रेशीम कोश उत्पादन थांबण्याची शक्यता आहे, ते पुन्हा जूनमध्ये सुरू होण्याची आशा आहे.

बॅचपुढे तापमान वाढीचे संकट

तापमान वाढीच्या प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात साधारणपणे १५० च्या आसपास शेतकऱ्यांचे कोश उत्पादन सुरू आहे. हे कोश उत्पादन घेताना तापमान नियंत्रणासाठी वेगवेगळे प्रयोग शेतकरी करताना दिसत आहेत. यामध्ये रेशीम कोश उत्पादनाच्या शेडला आच्छादन करणे, त्यावर पाणी सोडणे, वाढलेल्या वेली शेडवर चढविणे, शेडमध्ये कुलर लावणे, फॉगर्सचा वापर थंडावा राहण्यासाठी करणे आदी प्रयोग शेतकरी करत आहेत.

महारेशीम अभियानातून नोंदणी झाली मात्र पाण्याच्या अनुपलब्धतेपायी शेतकऱ्यांचे नियोजन प्रभावित झाले. अनेक शेतकऱ्यांनी लागवडीकरिता रोपांचे बुकिंग केले आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना सशक्त रोपे उपलब्ध करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आहेत. नोंदणीप्रमाणे अपेक्षित लागवडीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
- बी. डी. डेंगळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
शेडच्या पत्र्यावर स्प्रिंकलर लावलेले आहे. त्याचे पाणी वायाला जाऊ नये यासाठी मी आपल्या घरची जुनी साडी साईडने बांधून त्याचे पाणी शेडभोवती लावलेल्या पोत्यावर उतरवले. शिवाय शेडमध्ये दोन कूलरही लावले आहेत. त्यामुळे तापमान नियंत्रित करणे शक्य होत आहे.
- जनार्दन गीते, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT