Sericulture : शाश्वत उत्पन्नासाठी रेशीम शेती ठरेल फायद्याची

Silk Farming : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रेशीम शेती यशस्वी करणाऱ्या जगन्नाथ मगर, सुग्रीव देवकर, कैलास पाटील, हनुमंत सांगोलकर, विमला बिराजदार या शेतकऱ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते बुके आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Sericulture
Sericulture Agrowon
Published on
Updated on

Solapur News : नैसर्गिक आपत्तीचा तुलनेने कमी फटका बसणारी, कमी खर्चात आणि कमी वेळेत, शाश्वत उत्पन्न देणारी रेशीम शेती शेतकऱ्यांना निश्चितच फायदेशीर ठरू शकते, शेतीतल्या आजच्या विविध समस्यांचा विचार करता, रेशीम शेती हा शेतकऱ्यांना उत्तम पर्याय आहे, असे मत राज्याच्या रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी शनिवारी (ता. १७) येथे व्यक्त केले.

केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रेशीम धागा तंत्रज्ञान व त्यावर आधारित उद्योग’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शनिवारी (ता. १७) शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Sericulture
Sericulture Farming : अल्पभूधारक युवकाचे रेशीम शेतीत धवल यश

त्यात श्री. ढवळे बोलत होते. क्यूबा देशाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार डॉ. अधिकराव जाधव, माजी कुलगुरू, तथा सिंहगड इन्स्टिट्यूटचे संशोधन संचालक डॉ. एस. एच. पवार, सिंहगड अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार या वेळी उपस्थित होते.

डॉ. जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की शेतकऱ्यांनी भरपूर उत्पन्नासाठी रेशीम शेतीकडे वळावे व आत्महत्यामुक्त महाराष्ट्र घडवावा, सरकारच्या वतीने एकरी साडेचार लाखांचे अनुदान रेशीम शेतीला दिले जाते, याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच या वेळी त्यांनी क्यूबा देशातील तसेच इतर देशांतील रेशीम उद्योगासंदर्भात त्यांचे विविध अनुभव कथन केले.

Sericulture
Sericulture Farming : दुष्काळी भागात रेशीम शेतीला शेतकरी देणार प्राधान्य

यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभवकथन

जिल्ह्यातील विविध तालुक्यातील रेशीम शेती यशस्वी करणाऱ्या जगन्नाथ मगर, सुग्रीव देवकर, कैलास पाटील, हनुमंत सांगोलकर, विमला बिराजदार या शेतकऱ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते बुके आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

दिवसभर चाललेल्या सत्रांमध्ये रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा या कार्यक्रमात रेशीम उद्योगातून आर्थिक भरभराट करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव कथन या वेळी करण्यात आले. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह देशातून सुमारे ४०० शेतकरी व संशोधक उपस्थित होते.

रेशीमवर शास्त्रज्ञ-विद्यार्थी संवाद

या परिषदेच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या प्रदर्शनावेळी सहभागी झालेल्या विविध शास्त्रज्ञांशी शालेय विद्यार्थ्यांचा संवादही चांगलाच रंगला, या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रेशीम कसे तयार होते, रेशीम किडे, कोष, त्याच्या अवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे त्यांनी घेतली. तसेच शास्त्रज्ञांनीही विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहून रेशीमचे वैज्ञानिक, जैवशास्त्रीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com