Sericulture Farming : सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे वाढतोय कल

Sericulture Business : सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढत असून, जवळपास ६२९ शेतकरी या व्यवसायात प्रत्यक्षात उतरले आहेत.
Sericulture
SericultureAgrowon

Solapur News : सोलापुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढत असून, जवळपास ६२९ शेतकरी या व्यवसायात प्रत्यक्षात उतरले आहेत.

या व्यवसायासाठी आवश्यक असणारी तुतीची लागवड जिल्ह्यात ५४० एकरावर होती, यंदा त्यात आणखी ३६२ एकराची भर पडली आहे. त्यामुळे तुतीची एकूण लागवड ९०२ एकरपर्यंत पोचली आहे.

कमी कालावधीत, कमी खर्चात हा व्यवसाय शेतकऱ्यांना चांगला जोडधंदा ठरला आहे. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात त्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ तालुक्यांमध्ये रेशीमशेती होते आहे. प्रामुख्याने पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा या तालुक्यात या उद्योगाचे प्रमाण अधिक आहे.

आतापर्यंत ६२९ शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात प्रकल्प उभारले असून, जिल्ह्यातील जवळपास २२८ गावामध्ये हे प्रकल्प आहेत. या योजनेच्या लाभासाठी सिल्क समग्र-२ आणि मनरेगा अशा दोन योजना राबवल्या जातात. या योजनांच्या लाभासाठीही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो आहे.

Sericulture
Sericulture Farming : दुष्काळी भागात रेशीम शेतीला शेतकरी देणार प्राधान्य

सिल्क समग्र-२ योजनेतून तुती लागवड, साहित्य, शेड, ठिबक सिंचन आणि निर्जंतुकीकरण यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ३ लाख ७५ हजार रुपये, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

तर मनरेगाअंतर्गत तुतीलागवड, साहित्य खरेदी, किटक संगोपन गृह कुशल व अकुशल यासाठी पहिल्यावर्षी २ लाख ८६ हजार रुपये, दुसऱ्या आणि तिसऱ्यावर्षी प्रत्येकी ५५ हजार ६०० रुपये असे ३ लाख ९७ हजार रुपये दिले जातात.

Sericulture
Sericulture Farming : अल्पभूधारक युवकाचे रेशीम शेतीत धवल यश

जिल्ह्यातील तालुकानिहाय तुतीलागवड क्षेत्र

एकरमध्ये आणि कंसात शेतकरी संख्या ः माळशिरस- १८६.५० (१७३), पंढरपूर -१४३.५० (१३६), सांगोला-११४.५० (१०४), मंगळवेढा- २२ (१६), बार्शी- ७९ (७५), करमाळा- ३२ (२६), माढा-८७ (५९), अक्कलकोट-९६ (६४), मोहोळ-१०९.५० (९७), दक्षिण सोलापूर-९ (६), उत्तर सोलापूर- २३.५० (१४)- एकूण-९०२.५० (७७०)

शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शाश्वत उत्पन्नाची हमी यातून मिळते, शिवाय शासनाच्या योजनांतूनही अनुदान घेता येते, अन्य कोणत्याही पिकापेक्षा यात नुकसान कमी आहे. मुख्यतः बाजाराची हमी आहे.
विनीत पवार, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com