Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought : नांदगावतील दुष्काळाची राष्ट्रवादीकडून दखल

Drought Condition : नांदगावतील दुष्काळाची राष्ट्रवादीकडून दखल घेत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अडचणी मांडून जनतेला न्याय मिळण्याची मागणी केली.

Team Agrowon

Nashik News : दुष्काळ जाहीर करावा ही दुर्दैवी मागणी जनता हौस म्हणून करत नसते, दुष्काळ जाहीर होण्यासाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती व शास्त्रीय निकष या सर्व बाबींमध्ये नांदगाव तालुका तंतोतंत बसत असतानाही शासनाने ट्रिगर-२ अंतर्गत नांदगावचा समावेश केला नाही.

ही बाब मुंबई येथे नांदगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडली. कांदा अनुदान, शेतीमालाचे घसरलेले भाव, निर्यातशुल्क, जीवनावश्यक वस्तूंची महागाई या प्रश्नांवर चर्चा करून जनतेला न्याय मिळावा, असे गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सादरीकरण केले.

त्याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांना टॅग करीत ट्विट केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही नांदगावच्या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त करीत शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे मान्य केले.

दुष्काळाबाबत नांदगाव तालुका राष्ट्रवादीकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुष्काळासंदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी तातडीने ट्विट केले व नांदगावच्या दुष्काळाबाबत संसदेत आवाज उठविला जाईल, असे पक्षाच्या तालुक्यातील शिष्टमंडळाला आश्वासित केले.

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या तालुक्याला वगळण्यात आले आहे. अवर्षणामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. हे लक्षात घेता या तालुक्याचा फेरअहवाल जिल्हा दुष्काळ देखरेख समितीमार्फत मागवून तो मंजूर करून घेण्याची गरज आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या द्विटद्वारे केली.राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT