Pune News: उष्णतेच्या लाटेत होरपळत असलेल्या राज्यात शुक्रवारपर्यंत (ता. २०) जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात घट होऊन राज्यात सध्या आलेली उष्णतेची लाट काहीशी ओसरण्याची शक्यता आहे..शुक्रवारपर्यंत (ता. २०) राज्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी (ता. १८) आणि गुरुवारी (ता. १९) राज्याच्या सर्वच विभागांत पावसाचा अंदाज आहे. शुक्रवारनंतर पाऊस पुन्हा उघडीप देण्याची शक्यता आहे..कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घट होत उष्णतेची लाट काही दिवस कमी होणार आहे. दरम्यान, उन्हाचा ताप वाढल्याने विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज (ता. १६) कोकणात उष्ण लाटेचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Pre Monsoon Rain: आजपासून ५ दिवस पावसाचा अंदाज; राज्यभरात पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण.मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आता उत्तर कर्नाटकपासून भारत आणि श्रीलंकेला लागून असलेल्या कोमोरियन भागापर्यंत सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी लावली. सोमवारी (ता. १६) पंजाबच्या गुरुदासपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील अमरावती येथे देशातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..कमाल तापमान ४० अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अमरावती येथे उष्णतेची लाट होती. अकोला, वाशीम, वर्धा येथे ४० अंशांपेक्षा अधिक, जेऊर, मालेगाव, सोलापूर आणि यवतमाळ येथे तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..आज (ता. १७) तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहून व तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र १३.२ ३९.८पश्चिम महाराष्ट्र १६.४ ३९.०मराठवाडा १६.५ ३८.८विदर्भ १८.६ ४०.६कोकण २१.३ ३४.३.सोमवारी (ता. १६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :शहर कमाल किमानपुणे ३५.८ १६.४धुळे ३८.० १३.२जळगाव ३७.० २०.७जेऊर ३९.५ १८.०कोल्हापूर ३५.४ २०.९महाबळेश्वर २९.२ १७.४मालेगाव ३९.८ १८.०नाशिक ३४.४ १६.५.Maharashtra Weather: राज्यात वादळी पावसाचा इशारा.निफाड ३६.३ १३.२सांगली ३६.३ २०.८सातारा ३६.७ १७.७सोलापूर ३९.० २३.४सांताक्रूझ ३१.९ २३.०डहाणू ३४.३ २१.३रत्नागिरी ३२.७ २१.६.छत्रपती संभाजीनगर ३७.२ १९.०पुणे ३५.८ १६.४धुळे ३८.० १३.२जळगाव ३७.० २०.७जेऊर ३९.५ १८.०कोल्हापूर ३५.४ २०.९महाबळेश्वर २९.२ १७.४मालेगाव ३९.८ १८.०नाशिक ३४.४ १६.५.निफाड ३६.३ १३.२सांगली ३६.३ २०.८सातारा ३६.७ १७.७सोलापूर ३९.० २३.४सांताक्रूझ ३१.९ २३.०डहाणू ३४.३ २१.३रत्नागिरी ३२.७ २१.६छत्रपती संभाजीनगर ३७.२ १९.०.वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अमरावती ४०.६, वाशीम ४०.२, अकोला ४०, वर्धा ४०..राज्यात २० मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण काहीसे अधिक असण्याची शक्यता आहे. पण मार्च महिन्यातील पावसाची सरासरी कमीच असते. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाही. बुधवारी (ता. १८) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या सहा जिल्ह्यांत किरकोळ गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही.माणिकराव खुळे, निवृत्त हवामान शास्त्रज्ञ, भारतीय हवामान विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.