Drought Condition : डोळ्यांना दिसतोय, तो दुष्काळ सॅटेलाइटला का दिसत नाही?

Maharashtra Drought : सॅटेलाइटच्या डोळ्यांना सर्वेक्षणात नांदगावचा दुष्काळ दिसला. मात्र, प्रत्यक्षात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नाहीत, असाच काहीसा प्रकार सध्या तालुक्याच्या वाट्याला आला आहे.
Karnataka Drought Condition
Karnataka Drought Conditionagrowon
Published on
Updated on

Nashik News : सॅटेलाइटच्या डोळ्यांना सर्वेक्षणात नांदगावचा दुष्काळ दिसला. मात्र, प्रत्यक्षात दुष्काळाच्या झळा जाणवल्या नाहीत, असाच काहीसा प्रकार सध्या तालुक्याच्या वाट्याला आला आहे.

याउलट सगळं कसं आलबेल असल्याची इमेज सॅटेलाईटने टिपली असावी असे वातावरण यंत्रणेकडून उभे करण्यात आले, त्यात भर घातली ती शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने... दुष्काळासाठी स्वीकारण्यात आलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या कार्यपद्धतीच्या नोंदीतून नांदगाव गायब झाले आहे.

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील झालेला सर्वात पाऊस, उत्पादनात झालेली नीचांकी घट या बाबी अधिक विश्वासार्ह म्हणून वापरण्यात आलेल्या सॅटेलाईटच्या आधुनिक डोळ्यांनाही िदसल्या नाहीत. ग्राउंड लेव्हलवरच्या आपल्याच कार्यपद्धतीला बगल देत शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने केवळ नांदगावचे नव्हे तर चांदवड व देवळा, बागलाण या तालुक्यातल्या स्थितीलाही अनुल्लेखाने चक्क दुर्लक्षित केले.

Karnataka Drought Condition
Drought Review : गेडाम यांनी सूत्रे स्वीकारताच घेतला दुष्काळाचा आढावा

त्यामुळे असंतोषाचा हा वणवा वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर विसंबून असणारी तालुका व जिल्हास्तरीय यंत्रणा गाफील राहिली. दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यावर ओढविलेली स्थिती पाहून आमदार सुहास कांदे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे.

Karnataka Drought Condition
Maharashtra Drought : दुष्काळाचे प्रशासकीय काम अंतिम टप्प्यात

आता दुष्काळाच्या मुद्द्यांवर आपली प्रतिष्ठापनाला लावली असून आपल्याच सरकारला त्यांनी पुन्हा एकदा ललकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी असलेल्या आमदार कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नव्या सुधारीत यादीत नांदगावचा समावेश होण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे.

हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या निदर्शनास लक्षात आणून दिला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या नव्या सुधारित यादीत लवकरच नांदगाव तालुक्याचा समावेश झालेला दिसणार आहे.
-सुहास कांदे, आमदार, नांदगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com