Kolhapur News: आम्ही चोख कारभार केल्यामुळेच कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ) प्रगती केल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले. .तसेच संचालक मंडळाचे नियोजन आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळेच ‘गोकुळ’ सहकार क्षेत्रात अतिउच्चतम पातळीवर पोहोचला आहे. उत्कृष्ट गुणवत्ता व दर्जा यामुळे आगामी काळात उत्कृष्ट दुग्धजन्य उत्पादनात गोकुळ हा देशातील एकमेव दूध संघ असेल, असे गौरवोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले..Gokul Dairy : म्हैस, गाय दूध खरेदी दरात गोकुळकडून रुपयाने वाढ .‘गोकुळ’ ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्पस्थळी दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनात आणखी एक भर पडलेल्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा प्रारंभ व ‘गोकुळ श्री’ पुरस्कारासह विविध बक्षीस वितरण समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते. या वेळी विश्वास कदम (केर्ली, करवीर), .विजय दळवी (लिंगनूर क.नूल, गडहिंग्लज) व वंदना जरळी (गडहिंग्लज), गाय स्पर्धक : युवराज चव्हाण (रांगोळी, हातकणंगले), महेश तवनोजी (बोडकेनहट्टी, बेळगाव) व दीपक सावेकर (बेलवळे बु. कागल) या पशुपालकांना गौरविण्यात आले..Gokul Milk Union: परदेशी अभ्यासकांची गोकुळ दूध संघाला भेट; उपक्रमांचे कौतुक.मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर ‘गोकुळ’च्या पारदर्शक कारभारामुळे प्रगती झाली आहे. संघाच्या ठेवींमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून, ३०० कोटींच्या ठेवी आज ६०४ कोटींवर गेल्या. दूध संकलनात २० लाख लिटर संकलनाचा टप्पा पार केला आहे. दूध उत्पादकांना किमान प्रति लिटर २ रुपये जादा दर देण्याचे आश्वासन पूर्ण करताना पाच वर्षांत १४ वेळा दूध दरवाढ केली. भविष्यात २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.’’.आमदार पाटील म्हणाले, ‘‘केवळ दूध विक्री न करता दुग्धजन्य पदार्थांची उत्पादने घ्यावीत, अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे दही, तुप, बासुंदी व्यतिरिक्त गुलाबजाम व गोकुळ आईस्क्रीम सारखी उत्पादने घेऊन दूधाच्या पुढे जाऊन गोकुळचा विस्तार झाला आहे.’’आमदार चंद्रदीप नरके, अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची भाषणे झाली. स्वागत अरुण डोंगळे यांनी केले. प्रास्ताविक विश्वास पाटील यांनी केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.