Drought affected in Karnataka : : माॅन्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर सिद्धरामय्या सरकारने राज्यातील २३६ तालुक्यांपैकी १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी केंद्रीय पथक कर्नाटकामध्ये दाखल झाले. तीन दिवसांच्या दौऱ्यात हे पथक विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
यंदा कर्नाटकात पावसाचा मोठा खंड पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्के पावसाची तूट झाली. त्यामुळे अनेक भागातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी करू शकले नाही. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. पण पावसाने ओढ दिल्याने हंगामातील पिके वाया गेली. त्यात सुमारे ४२ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्नाटक २३६ तालुक्यांपैकी १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते.
काल केंद्रीय पथक कर्नाटकमध्ये दाखल झाले. त्यांनी तीन टीममध्ये राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. कृषी मंत्रालयाचे संयुक्त सचिव अजित कुमार साहू यांच्या नेतृत्वाखाली पहिली टीम आज बेळगाव आणि विजापूर परिसरात दौरा करणार आहे. 7 ऑक्टोबरला बागलकोट आणि धारवाडला जाईल. पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार डी. राजशेखर यांच्या नेतृत्वाखालील दुसरी टीम 6 ऑक्टोबरला गदग आणि कोप्पल जिल्ह्यांना आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विजयनगर आणि बल्लारी जिल्ह्यांना भेट देईल.
जल आयोगाचे संचालक अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखालील तिसरे पथक 6 ऑक्टोबर रोजी चिक्कबल्लापूर आणि तुमकूर जिल्ह्यांना भेट देणार आहे. यानंतर, 7 ऑक्टोबर रोजी, ते चित्रदुर्ग आणि दावणगेरेमधील दुष्काळग्रस्त परिस्थितीचे पाहणी करेल, 8 ऑक्टोबर रोजी बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्याच्या भेटीसह समारोप होईल. ९ ऑक्टोबर रोजी तिन्ही टीम दिल्लीला परतण्यापूर्वी राज्यातील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.