Pune News: लांबलेला पाऊस, ऑक्टोबर हिटचा कमी कालावधी आणि लांबलेली थंडी अशा विचित्र हवामानामुळे विविध फळांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने हंगाम तोंडावर आलेल्या हापूस आंब्याचा समावेश असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना आंबा आंबटच असणार आहे. तर आंब्याचा सुरळीत हंगाम एप्रिलमध्ये सुरू होऊन मे मध्येच संपणार आहे. .पुणे बाजार समितीतील कोकण आंब्याचे आडतदार करण जाधव म्हणाले, ‘‘आंबा हंगामाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे मी नुकताच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी कोकणचा दौरा केला. या दौऱ्यात संपूर्ण कोकणात रात्री व पहाटे कडक थंडी, धुके आणि दव तर दुपारी तीव्र उष्णता असे हवामान दिसून आले. या बदलत्या वातावरणामुळे अनेक झाडांवरील मोहोर जळून काळा पडलेला होता. परिणामी झाडांवर अपेक्षित फळधारणा झालेली दिसली नाही. शेतकऱ्यांच्या मते यंदा केवळ २५ ते ३० टक्केच उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.’’.Alphanso Mango Farming: मुळशीतील शेतकऱ्यांची सिंधुदुर्गातील आंबा बागांना भेट.यंदा कोकणात पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यामुळे जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकून राहिला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ऑक्टोबरपर्यंत वातावरण थंड राहिल्याने आंब्याच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. त्यामुळे प्रारंभी हंगाम चांगला राहील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. .मात्र त्यानंतर थ्रिप्स आणि तुडतुड्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या किडींमुळे मोहोर व कोवळ्या फळांवर परिणाम होऊन मोहोर गळणे, फळांची वाढ खुंटणे आणि गुणवत्तेत घट होणे अशा समस्या निर्माण झाल्या. अनेक बागांमध्ये सुरुवातीला दिसलेली फळधारणा नंतर टिकलीच नाही..Mango Farmers: आंबा-काजू बागांच्या नुकसानीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करा : शेट्टी.उत्पादन घटल्यामुळे बागायतदारांचे वार्षिक नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक बागायतदारांनी आंबा बागांची राखण करण्यासाठी नेपाळमधून येणाऱ्या गुरख्यांना यंदा कामावर ठेवलेले नाही. मजुरी, कीटकनाशके फवारणी आणि देखभाल खर्च वाढला असतानाही अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने आर्थिक ताण वाढला आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेमुळे फळगळ झाल्याचे गावखडी (रत्नागिरी) येथील शेतकरी मंदार कदम यांनी सांगितले..आवक केवळ १०० ते १५० पेट्यागेल्या वर्षी १० ते १५ मार्चदरम्यान पुणे बाजार समितीत दररोज दोन ते तीन हजार हापूस पेट्यांची आवक होत होती. मात्र यंदा सध्या केवळ १०० ते १५० पेट्यांचीच आवक होत आहे. १९ मार्चला गुढीपाडवा असल्याने मागणी वाढणार असली तरी उपलब्धता अत्यल्प असल्याने दर चढे राहण्याची शक्यता आहे, असे करण जाधव यांनी सांगितले..गेल्या २० वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आंब्याचा तुटवडा जाणवत आहे. यंदा गुढीपाडव्याला हापूस आंब्याचे दर अडीच ते चार हजार रुपये डझनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पेटीला सहा हजार रुपये भाव होता.अरविंद मोरे, आंबा आडतदार, पुणे बाजार समिती, पुणे.मुंबई (वाशी) बाजार समितीमध्ये देखील गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १६) केवळ ६ हजार पेट्यांची आवक झाली होती. हीच आवक गेल्यावर्षी १५ ते २० हजार पेट्या एवढी होती. यावर्षी आवक कमीच राहणार असल्याने ग्राहकांनी जास्त दराने आंबा खरेदीची मानसिकता ठेवली पाहिजे. तरच अडचणीत आलेले कोकणातील शेतकरी तगेल.संजय पानसरे, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.