Dr. Smita Solanki Agrowon
ॲग्रो विशेष

Women Impowerment : कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात मास्टर असलेल्या डॉ. स्मिता सोलंकी

Dr. Smita Solanki : पीक उत्पादन, शेतीसाठी उपयोगी विविध यंत्रांची निर्मिती आणि संशोधन क्षेत्रात डॉ. स्मिता सोलंकी यांनी आपला ठसा उमटवला आहे.

Team Agrowon

Women In Agriculture : आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. विविध क्षेत्रात अनेक प्रगतीची शिखरे महिलांनी सर केली आहेत. महिलांनी आपल्या कौशल्याचा वापर कोणत्याही क्षेत्रात केल्यास त्या क्षेत्राच्या विकासाला एक नवीन दिशा मिळते.

अशा विविध क्षेत्रापैकीच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेती क्षेत्रात तर महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शेतकरी, मजूर, उद्योजक ते कृषी शास्त्रज्ञांपर्यंत महिला शेती व्यवसायात भरारी घेत आहेत.

या महिलांपैकीच एक आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात अॅग्रीकल्चर रिसर्च इंजीनिअर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. स्मिता सोलंकी. पीक उत्पादन, शेतीसाठी उपयोगी विविध यंत्रांची निर्मिती आणि संशोधन  क्षेत्रात डॉ. स्मिता सोलंकी यांनी आपला ठसा उमटवला आहे. 

गेल्या ३३ वर्षापासून डॉ. स्मिता सोलंकी कृषी अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत आहेत.  त्यांनी आतापर्यंत महिला,  कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांना उपयोगी पडतील अशा विविध ४३ अधुनिक यंत्रांची संशोधनातून निर्मिती केले आहे.

 हे संशोधन फक्त कागदावर न ठेवता या अधुनिक अवजारांचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी त्या सतत प्रयत्नशिल असतात. त्यासाठी त्या विविध प्रात्यक्षिके, आभ्यास दौरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि समाज माध्यमातून शेतकऱ्यांना या अधुनिक अवजाराची माहिती देत असतात.  

ही यंत्रे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावीत यासाठी संशोधन केलेली यंत्रे तयार करणाऱ्या कंपन्या आणि कृषी विभाग, विविध एनजीओ, कृषी विज्ञान केंद्रे, गोशाळांनी एकत्र यावे यासाठी त्यानी प्रयत्न केले.    

ज्या काळात कृषी आभ्यासक्रमात महिलांचा सहभाग नव्हता त्या काळात पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या कृषी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊन त्यांनी एकप्रकारचे धाडसच केले. फक्त पदवी घेऊन न थांबता त्यांनी  शेती अवजारे विषयात पीएचडी पूर्ण केली. डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी १९८९ साली महाबीज येथे प्लॅन्ट इंजीनियर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यानंतर १९९३ ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. आतापर्यंत विद्यापीठात त्यांनी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.   या कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत १५ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यामध्ये टॉप हंड्रेड वुमेन आयकॉन अॅवॉर्ड, कृषी नारी सन्मान, महाराष्ट्र भुषण आणि जीवनगौरव, बेस्ट रिसर्च अॅण्ड एक्सटेंन्शन, वुमेन लिटरशिप अॅवॉर्ड, बेस्ट रिसर्चर इन महाराष्ट्रा, बेस्ट सायंटीस्ट अॅवॉर्ड अशा महत्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

(An initiative by Salam Kisan.) 

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.) 


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

Saline Land: जमीन क्षारपड मुक्तीसाठी ‘श्री दत्त पॅटर्न’ला शासनाची मदत

Tuti Cultivation: सांगली जिल्ह्यात ‘महारेशीम’ची ९७ एकरांवर तुती लागवड

Electricity Bill Dues: ग्रामपंचायतींच्या वीजबिल थकबाकीची अडचण कायम 

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

SCROLL FOR NEXT