Animal Husbandry: शेतकरी नियोजन । पशुपालनशेतकरी : किरण एकनाथ घावटेगाव : अंमळनेर (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर)एकूण शेती : १२ एकरपशुधन संख्याः: १५ गाई, २ म्हशी, ५ कालवडी.अहिल्यानगर जिल्ह्यातील अंमळनेर (ता. नेवासा) येथील एकनाथ यादव घावटे हे प्रगतिशील शेतकरी. सध्या त्यांची मुले किरण व सोमनाथ ही शेती आणि दुग्ध व्यवसायाचे व्यवस्थापन पाहतात. घावटे कुटुंब मागील तीस वर्षांपासून अल्प प्रमाणात पशुपालन व्यवसाय करत होते. आधी त्यांच्याकडे चार-पाच गाई असायच्या. मागील दहा वर्षांत त्यांनी पशुधनाच्या संख्येत हळूहळू वाढ केली. सध्या त्यांच्याकडे १५ गाई, २ म्हशी आणि ५ कालवडी आहेत. दररोज १२० लिटरपर्यंत दुधाचे संकलन होत आहे..Dairy Farming: आदर्श गोठा पुरस्काराचा राज्यभरात आदर्श घ्यावा; पालकमंत्री आबिटकर.वडिलोपार्जित बारा एकर शेतीपैकी पाच एकरांत कापूस, चाऱ्यासाठी गिन्नी गवत, २ एकर घास, दीड एकर मका, अडीच एकर ऊस आहे. गाईंच्या संगोपनासाठी मुक्तसंचार गोठा उभारला आहे. त्यामुळे दैनंदिन कष्ट कमी झाले आहे. शिवाय दूध उत्पादनातही वाढ मिळाली आहे. शेतीला पशुपालनाची जोड देत दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यात घावटे कुटुंबाला यश आले आहे. पशुपालन व्यवसायात चारा, आरोग्य आणि गोठा व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत झाल्याचे एकनाथ घावटे सांगतात..व्यवस्थापनातील बाबीगाईंच्या संगोपनासाठी मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे व्यवस्थापन अधिक उत्तमपणे करणे शक्य झाले आहे. दुग्ध व्यवसायात मुक्तसंचार गोठा अधिक फायदेशीर ठरतो असा त्यांचा अनुभव आहे.गोठ्यातील दैनंदिन कामाला सकाळी पाच वाजता सुरुवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला आणून बांधल्या जातात. त्यानंतर दूध काढणी यंत्राच्या मदतीने दूध काढले जाते. त्यानंतर चारा व खुराक दिला जातो..Dairy Farming Success : तेवीस वर्षाचा पृथ्वीराज झालाय कुटुंबाचा मुख्य कणा .एका गाईला दररोज सकाळी साधारण सात ते आठ किलो चारा दिला जातो. त्यात गिन्नी गवत, कडवळ किंवा, ऊस कुट्टी तसेच घास यांचा समावेश असतो. सकाळी द्यावयाची चारा कुट्टी रात्रीच करून ठेवलेली असते.दररोज संध्याकाळी चार वाजता पुन्हा दूध काढणी, चारा व अन्य कामे केली जातात. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.मुक्तसंचार गोठ्यात जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाण्याची व्यवस्था केलेली आहे..खाद्य व्यवस्थापनहिरव्या चाऱ्याची कुट्टी करून दिली जाते. त्यात गिन्नी गवत, कडवळ किंवा, ऊस कुट्टी तसेच घास यांचा समावेश असतो. खुराकामध्ये गोळीपेंड, सरकी पेंड यांचा समावेश केला जातो. दुभत्या गाईला दूध देण्याच्या क्षमतेनुसार गोळीपेंड व सरकी पेंड, त्यासोबत प्रथिनयुक्त खाद्य दिले जाते. हे सर्व चाऱ्यात मिसळून दिले जाते. त्यामुळे चारा खाण्यासह पाणी अधिक पिले जाते. चाराटंचाईचा सामना करण्यासाठी ३५ ते ४० टन मुरघास निर्मिती करून ठेवली जाते. त्यामुळे जनावरांना टंचाईच्या काळात दर्जेदार चारा उपलब्ध होतो..आरोग्य व्यवस्थापननवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. वासरू जन्मल्यानंतर सुरुवातीचा एक महिना वासराला गाईला थेट दूध पाजले जाते. त्यानंतर एक महिन्याने स्वतंत्र बाजूला दूध पाजले जाते. हळूहळू वासरांना दूध देण्याचे प्रमाण कमी केले जाते. आणि खाद्य खाण्याची सवय लावली जाते. वासरांच्या वाढीसाठी आवश्यक खुराक दिला जातो.पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनावर भर दिला जातो. त्यांना लम्पी, लाळ्या खुरकूत या साथीच्या आजारांचे लसीकरण प्राधान्याने नियमित केले जाते. मागील काही दिवसांपूर्वी गोठ्यातील सर्व गाईंना लम्पी, लाळ्या खुरकुताचे लसीकरण केले आहे. गोठ्यातील प्रत्येक जनावराचे नियमित निरीक्षण केले जाते. गरजेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जातात.मुक्त संचार गोठ्यात गोचीड, डास निर्मूलनाला प्राधान्य दिले जाते..शेतीमध्ये शेणखत वापरावर भरदरवर्षी गोठ्यातून सुमारे ३० ते ३५ ट्राॅली शेणखत उपलब्ध होते. त्यातील बहुतांश शेणखताचा वापर घरच्या शेतीमध्ये केला जातो. विशेषतः चारा पिकांच्या लागवडीत केला जातो. मागील दहा वर्षांपासून केवळ शेणखताचा वापर शेतीमध्ये केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली आहे. त्यातून दर्जेदार चारा उत्पादन तसेच पीक उत्पादनात वाढ झाली आहे.- किरण घावटे, ९८८१३८१३१५(शब्दांकन : सूर्यकांत नेटके).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.