
Agriculture Research News छत्रपती संभाजीनगर : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र छत्रपती संभाजीनगर येथे स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
या भागातील शेतकऱ्यांना परभणी येथे जाण्याची गरज भासू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले. विद्यापीठाचे संशोधन (Agriculture Research) चांगले आहे, ते अधिक गतिमान करण्यासाठी निधी देण्यात येईल, असे ते म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. ११) फळ संशोधन केंद्रास भेट दिली. नूतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी, फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. बी. पाटील, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, भरत राजपूत आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री म्हणाले, की नुकताच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कृषीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या योजना आणि विद्यापीठाचे संशोधन हे या विभागातील शेतकऱ्यांना पोचण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
या कार्यक्रमासाठी सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार , प्राचार्य कृषी महाविद्यालय बदनापूर डॉ राकेश अहिरे, प्रभारी अधिकारी डॉ. दीपक पाटील, डॉ. संजय पाटील कार्यक्रम समन्वयक डॉ किशोर झाडे, डॉ. सचिन सोमवंशी डॉ. भगवानराव कापसे, द्वारकाभाऊ पाथरीकर, अशोक सूर्यवंशी आदींसह बदनापूर येथील चारही संस्थेचे सर्व शास्रज्ञ आणि अधिकारी सोबतच छत्रपती संभाजीनगर स्थित कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य कृषीतंत्र विद्यालय छत्रपती संभाजीनगरचे डॉ. किरण जाधव यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.