Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Galmukt Dharan :‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’तील कामांना गती द्यावी

Galyukt Shiwar Yojana : जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण २०९ कामापैकी १२५ कामे पूर्ण झालेली आहेत. सेल्फवर असलेल्या ८४ कामांपैकी १४ कामे पूर्ण करण्यात आलेली असून, यामधून ६.१९ लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आलेला आहे.

Team Agrowon

Solapur News : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील कामांना पावसाळा चालू होण्याच्या आत गती देऊन कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हास्तरीय आढावा बुधवारी (ता.९) बैठकीत द‍िल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. या वेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. डी. क्षीरसागर, कृषी उपसंचालक ए. सी. धेडे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस. एस. पारसे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सी. एस. सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी योजनेची जिल्ह्यातील सध्याच्या स्थितीची संबंधित यंत्रणांकडून माहिती घेऊन कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. संबंधित यंत्रणेकडून रद्द कामांबाबत माहिती घेऊन कारणे जाणून घेतली.

धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर जाऊन त्याची सुपीकता वाढेल या दृष्टीने प्रयत्न करावेत व गाळ काढल्याने पाणी साठवून क्षमता वाढेल त्यामुळे त्याचा सिंचनाला लाभ होईल.

३८ हजार ४४५ घनमीटर गाळ काढला

जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण २०९ कामापैकी १२५ कामे पूर्ण झालेली आहेत. सेल्फवर असलेल्या ८४ कामांपैकी १४ कामे पूर्ण करण्यात आलेली असून, यामधून ६.१९ लक्ष घनमीटर इतका गाळ काढण्यात आलेला आहे.

उर्वरित ७० कामांपैकी २ कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या दोन कामांमधून ३८ हजार ४४५ घनमीटर इतका गाळ काढण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. दामा यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT