Water Conservation : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे संवर्धन करा

Water Management : २०२५ जागतिक जलदिनाची थीम हिमनदी संवर्धन आहे. पृथ्वीतलाचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. या ७० टक्क्यांपैकी ३ टक्के हा गोड्या पाण्याचा साठा आहे.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : २०२५ जागतिक जलदिनाची थीम हिमनदी संवर्धन आहे. पृथ्वीतलाचा ७० टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे. या ७० टक्क्यांपैकी ३ टक्के हा गोड्या पाण्याचा साठा आहे. या गोड्या पाण्याच्या साठ्यातून फक्त ०.५ टक्के पाणी भूपृष्ठावर उपलब्ध स्वरूपात आहे. दिवसेंदिवस हे पाणी कमी होत आहे.

या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत हिमनद्या आहेत. उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी डिजिटल अॅग्रीकल्चर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्मार्ट शेती, सूक्ष्म सिंचन या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे संवर्धन करुया असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

Water Conservation
Water Conservation : उपलब्ध पाण्याचा आता काटकसरीने वापर व्हावा

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि भारतीय कृषी अभियांत्रिकी संस्था, राहुरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिन कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉ. शरद गडाख, वॉटर संस्थेचे संचालक संदीप जाधव, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, डॉ. सचिन नांदगुडे व डॉ. सचिन नलवडे उपस्थित होते.

डॉ. गडाख म्हणाले, की मागील पाच वर्षांत सगळ्यात जास्त हिमनद्यांचे बर्फ वितळले आहे. असेच जर सुरु राहिले तर २१ व्या शतकात सर्व बर्फ वितळण्याच्या स्थितीत राहील. पाण्याच्या अतिवापरामुळे दोन दशकांत जमिनीतील पाण्याची पातळी दोन मीटर खाली गेली आहे. अजूनही देशातील १६ कोटी जनतेला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही.

Water Conservation
Water Conservation : बंदिस्त वाफे तयार करणारं यंत्र वापरा ; कोरडवाहू जमीन पाणीदार बनवा

यासाठी शेती व इतर क्षेत्रात पाण्याचा ताळेबंद गरजेचा आहे. आता वेळ आली आहे शेती, माती, पाणी, शेतकरी यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निसर्गाचा ऱ्हास मनुष्याने केला आहे, म्हणून निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी मनुष्याचीच आहे. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. विठ्ठल शिर्के यांची भाषणे झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र बनसोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी तर आभार डॉ. सचिन नांदगुडे यांनी मानले. याप्रसंगी विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी सूरज गडगे, सोहन मोरे, विशाल हराळ यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com