Water Conservation : ‘जलतारा’मुळे दोन पावसाच्या हंगामातच पाणीपातळी वाढते

Jaltara Project : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी सारंग काळे व डॉ. राजीव दबडे यांच्या शेतात उत्तर सोलापूर तालुका कृषी विभाग व जलतारा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जलतारा प्रकल्पांतर्गत चर्चासत्र व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Water Conservation
Water Conservation Agrowon
Published on
Updated on

Solapur News : नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी सारंग काळे व डॉ. राजीव दबडे यांच्या शेतात उत्तर सोलापूर तालुका कृषी विभाग व जलतारा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने जलतारा प्रकल्पांतर्गत चर्चासत्र व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना जलतारा प्रकल्पाचे निर्माते व जलदूत पुरुषोत्तम वायाळ यांनी हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून, दोन पावसाच्या हंगामातच परिसराची पाणी पातळी वाढते, असे सांगितले.

उपविभागीय कृषी अधिकारी आर. एस. माळी, सरपंच राणी टोणपे, द्राक्ष बागायतदार सारंग काळे, डॉ. राजीव दबडे, डॉ. उदय मोरे, महादेव चाकोते, प्रल्हाद काशीद, प्रकाश चोरेकर, तात्यासाहेब कादे, दीपक अंधारे, प्रताप टेकाळे या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वायाळ म्हणाले, की. बोअर, विहीर पुनर्भरणाबरोबर शेत पुनर्भरण करणे गरजेचे आहे. जमिनीच्या भूगर्भात पाणी वाढवणे गरजेचे आहे.

Water Conservation
Jaltara Project : ‘जलतारा’ची १७ कामे शिराळा तालुक्यात पूर्ण

आपल्या शेतातील पाणी आपल्याच शेतात अडवणे म्हणजे शेत पुनर्भरण करणे आहे. जलतारा प्रकल्प शेत पुनर्भरणामुळे पाणीपातळी वाढणार असून, यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्नही वाढण्यास मदत होत आहे, असे ते म्हणाले.

या वेळी पाणी फाउंडेशनचे सत्यवान देशमुख, अतिश शिरगारे, मनोहर सिरसठ, ब्रह्मदेव शिंगाडे, राहुल माने, मंडल कृषी अधिकारी के. एल थिटे, अभिषेक सापते, मंडल कृषी अधिकारी शिल्पा कसबे, कृषी सहाय्यक अश्‍विनी कोळेकर उपस्थित होते.

Water Conservation
Jaltara Yojana : वाशीम जिल्ह्यात ‘जलतारा’ कामांना गती

काय आहे जलतारा प्रकल्प

जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मुरमाड जमिनीमध्ये पाणी थांबणाऱ्या शेतीच्या भागामध्ये चार बाय सहा फूट खड्डा खोदून, त्यामध्ये एक ते दीड ब्रास मोठे दगड टाकावेत. तर काळ्या जमिनीत सहा बाय सहा फूट रुंद, १० फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये मोठे दगड टाकावेत.

या माध्यमातून या खड्ड्यात दोन पावसाच्या हंगामामध्ये शंभर टक्के पाणी पातळी साठते आणि या परिसराच्या पाणीपातळीत वाढ होते, अशीही पद्धती असल्याचे वायाळ यांनी सांगितले. यावेळी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून त्यामध्ये दगड टाकून उपस्थित शेतकऱ्यांना जलताराचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com