Banana Research Centre Agrowon
ॲग्रो विशेष

Distribution of Seedlings, Inputs : केळी संशोधन केंद्रात रोपे, निविष्ठांचे वितरण

Banana Research Centre : केळी संशोधन केंद्रात शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांना आदिवासी विकास योजनेअंतर्गत केळीची उतिसंवर्धित रोपे, रासायनिक खते व कीडनाशकांचे वितरण करण्यात आले.

Team Agrowon

Jalgaon News : केळी संशोधन केंद्रात शहादा (जि. नंदुरबार) तालुक्यातील गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांना आदिवासी विकास योजनेअंतर्गत केळीची उतिसंवर्धित रोपे, रासायनिक खते व कीडनाशकांचे वितरण करण्यात आले.

शहाद्यातील मुबारकपूर, आडगाव, बहिरपूर व अंबापूर येथील १० शेतकऱ्यांना केळी रोपे, खते आदींचे वितरण झाले. या वेळी जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. दीपक दहात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,

जिल्हा परिषदेतील कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. बेडीस, केळी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर पुजारी, डॉ. व्ही. टी. गुजर, सी. एम. गुळवे, आकाश वसावे, विनोद लंगोटे आदी उपस्थित होते.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तडवी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी विकास अधिकारी जगताप यांनी जिल्हा परिषदेतील कृषी योजनांची व्याप्ती, त्यांचा लाभ व कृती कार्यक्रम याबाबत सांगितले.

डॉ. पुजारी यांनी केळी लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. त्यात केळीचे वाण, जमीन निवड, किडींची समस्या, त्यावरील उपाय व अन्य मुद्द्यांबाबत त्यांनी विवेचन केले. डॉ. व्ही. टी. गुजर यांनी केळी पिकावर येणाऱ्या रोग, किडींची समस्या किती नुकसान करते व त्यावर वेळीच कसे नियंत्रण आणावे, याबाबत सांगितले. प्राजक्ता वाघ यांनीही विविध योजनांची माहिती दिली. यानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम झाला. चंद्रशेखर गुळवे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT