Allocation of Agricultural Inputs : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी निविष्ठा वाटप

Critical Input Kits : नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषी निविष्ठांचे (क्रिटिकल इनपुट किट) वाटप जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते करण्यात आले.
 Suicidal Farmer Families
Suicidal Farmer FamiliesAgrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषी निविष्ठांचे (क्रिटिकल इनपुट किट) वाटप जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिलीप दमयावार, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा विजय बेतीवार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) तथा प्रकल्प उपसंचालक (आत्मा) अनिल शिरफुले, नांदेड तालुका कृषी अधिकारी, एस. बी. मोकळे,

 Suicidal Farmer Families
Crop Insurance Distribution : खरीप हंगामात फक्त २५ टक्के पीककर्जाचे वाटप

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रशेखर कदम व ‘आत्मा’चे श्रीहरी बिरादार व नंदीग्राम शेतकरी उत्पादक कंपनीचे संदीप डाकुलगे, के-फर्टस लॅबचे बी. बी. पेंडकर व नांदेड तालुक्यातील तळणी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबीय उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी वापरावयाच्या संवेदनशील कृषी निविष्ठा सामग्री पीक प्रात्यक्षिक अंतर्गत प्रचार व प्रात्यक्षिक राबविण्याच्या विस्तार कार्यक्रमाच्या योजनांसाठी जैविक कीटकनाशके व खते तयार करण्याच्या सोप्या पद्धती शेतकऱ्यांना समजावून सांगणे.

 Suicidal Farmer Families
Agriculture Input Center : कृषी निविष्‍ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक, भावफलक लावावा

तसेच त्यांचा प्रचार व प्रसाराचे विस्तार कार्य करण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रोम निर्मिती (पालाशयुक्त सेंद्रिय खत), जैविक कीटकनाशके, घरच्या घरी करून शेतीचा खर्च कमी करणे व काही प्रमाणात उत्पादनाची साधने निर्माण करण्याची आत्मामधून प्रात्याक्षिक कीट देऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे असे भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी सांगितले.

सार्वभौम ग्रामसभा अंतर्गत शेतकरी आत्महत्या झालेल्या गावांमध्ये ग्रामजयंती महोत्सव साजरा करून सक्षम ग्रामनिर्मितीसाठी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांची गावभेट दौऱ्या १ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान झालेला आहे. जिल्ह्यामध्ये ६३ गावांमधून ३३५ आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com