Agriculture Officer : कृषी अधिकारी देता का? कृषी अधिकारी, २५ कृषी सहायकांकडे ८६ गावांचा भार

Kagal Tehsil : कागल तालुक्यात ८६ गावांतील ३६ सज्जांसाठी ३६ कृषी सहायकांची गरज आहे, मात्र तालुक्यात २५ कृषी सहायक कार्यरत आहेत.
Agriculture Officer
Agriculture Officeragrowon
Published on
Updated on

Kolhapur Agriculture Department : शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि पीक उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाचा मोठा वाटा असतो. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांविना कारभार सुरू आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका कृषी संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो परंतु या तालुक्यातही कृषी विभागाची यंत्रणा सध्या तोकडी पडत असल्याचे चित्र आहे.

तालुक्यात ८६ गावांतील ३६ सज्जांसाठी ३६ कृषी सहायकांची गरज आहे, मात्र तालुक्यात २५ कृषी सहायक कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ८६ गावांतील शिवाराचा भार आहे. एका कृषी सहायकाला तीन ते चार गावांचा कारभार पाहावा लागत आहे. त्यामुळे कृषी सहायकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शासनाच्या कृषी विभागातर्फे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदी योजना कृषी विभागामार्फत राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणीपर्यंतचे कृषी सहायकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. परंतु, कृषी सहायकांची संख्या अपुरी असल्यामुळे एका कृषी सहायकाला तीन ते चार गावे सांभाळण्याची वेळ आली आहे.

मुरगूड, कापशी, कागल ही कृषी विभागाची तीन मंडळे आहेत. या तीन मंडळांत ३६ कृषी सहायकांची पदे मंजूर आहेत. कापशी, अलाबाद, तमनाकवाडा, कुरुकली, निढोरी, हळदी, हमीदवाडा, बोरवडे, पिराचीवाडी, सावर्डे बुद्रुक या ठिकाणी कृषी सहायकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे २५ कृषी सहायकांकडे ८६ गावांची जबाबदारी आली आहे.

Agriculture Officer
Agriculture Department : कृषी विस्तारासाठी गावनिहाय २८ सूत्री नियोजन आराखडे

कापशी, मुरगूड, कागल या तीन मंडळांसाठी केवळ २५ कृषी सहायक असल्याने कृषी विभागाची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. कृषी सहायक कमी असल्याचा अतिरिक्त ताण या त्यांच्यावर पडत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या विचारात घेऊन रिक्त पदे भरण्याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उत्पादनात वाढ होईल. तांत्रिक, अतांत्रिकांची पदे रिक्त असल्याने कार्यालयीन कामकाजावरही परिणाम होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे, दरम्यान या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्रमुख पदेच रिक्त

तालुका कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी या प्रमुखपदासह मंडल कृषी अधिकारी - १, लिपिक - १, अनुरेखक - ५, कृषी पर्यवेक्षक - १, वाहनचालक - १, शिपाई - ३ अशी सुमारे २४ पदे रिक्त आहेत. तालुक्याच्या कार्यालयात ६७ पदांपैकी केवळ ४३ पदांवर लोक कार्यरत आहेत. २४ पदे रिक्त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com