ॲग्रो विशेष

Onion Disease : कांदा पिकावर करपा, पिळरोगाचा प्रादुर्भाव

Onion Crop : सततच्या पावसामुळे कांदा पिकावर सध्या करपारोगाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे.

मोहन काळे 

Solapur News : सततच्या पावसामुळे कांदा पिकावर सध्या करपारोगाचा प्रादुर्भाव कमालीचा वाढला आहे. याचा फटका जिल्ह्यातील सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप कांदा पिकाला बसला आले.

सोलापूर जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड वाढली आहे. गेल्यावर्षी कांदा पिकाचे दर तेजीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे लागवड क्षेत्र वाढवले आहे. यावेळीही सुरवातीला कांद्याचे दर तेजीत होते.

मात्र सततच्या पावसामुळे कांदा जागेवरच नासू लागला. त्यामुळे बाजारपेठेत नासका कांद्याची आवक वाढू लागली. याचा परिणाम म्हणून बाजारपेठेत कांद्याचे दर कमालीचे पडले. नासक्या कांद्याची आवक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

नुकसानीचे पंचनामे नाहीत...

करपा, पिळरोगामुळे कांद्याची प्रत खलावू लागली आहे. असे असूनही कृषी विभाग व महसुल विभागाने अद्यापही कांदा पिकाची पाहणी करून पंचनामे केले नाहीत. सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नत्राचे प्रमाण वाढले. त्यामुळे कांदा पिकाच्या माना लांबणे व पाती वाकड्या - तिकड्या होऊन कांदा पिळरोगाला बळी पडला.

रोगामुळे काही प्लॉटमध्ये कांद्याचा गड्डाच तयार झाला नाही. हाताच्या फोडा प्रमाणे जपलेले पिक करपा रोगापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची फवारणी केली आहे. मात्र, कांदा पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागले नाही.

पावसामुळे आमचा कांदा जागेवरच नासून गेला आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी.
- पांडुरंग व्यवहारे, शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर
सध्या बाजारपेठेत नासक्या कांद्याची आवक वाढली आहे. दररोज एक हजार गाडी आवक होत आहे. अशा कांद्याला १ ते दीड हजार रुपयेच्या आतच भाव मिळत आहे. चांगल्या कांद्याला ३ हजार रुपयाच्या पुढे भाव मिळत आहे.
- श्रवण कराळे, कांदा व्यापारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून ‘गोकुळ श्री’ स्पर्धा, पहिलं बक्षिस ३५ हजार

Paddy Harvesting : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण

Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Winter Session of Parliament : संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून

SCROLL FOR NEXT