Pune News: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला नवीन कुलगुरू नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारला अखेर साडे सहा महिन्यांनंतर मुहूर्त सापडला आहे. राज्यपालांकडून कुलगुरू शोध व निवड समिती स्थापन करण्यात आली असून समन्वय अधिकारी पदी प्रा. डॉ. एस. सरवणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे..तांत्रिक दृष्ट्या कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांना असतात. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे २९ जानेवारी २०२५ रोजी निधन झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त आहे. सध्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे प्रभारी कुलगुरुपदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. नवीन कुलगुरूंची निवड करण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल ‘अॅग्रोवन’ने वृत्त प्रकाशित केले होते..MPKV Rahuri: महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाच महिन्यांपासून मिळेना कुलगुरू.या पार्श्वभूमीवर कुलगुरू शोध व निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु समन्वय अधिकारी पदावर राज्याबाहेरील व्यक्तीची नियुक्ती करण्यात आल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. कुलगुरुपदावरही राज्याबाहेरील व्यक्तीची नेमणूक केली जाईल, याचे हे संकेत असल्याची चर्चा सुरू आहे. समन्वयक अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आलेले प्रा. सरवणन तमिळनाडूच्या भारतियार विद्यापीठात गणित विभागात कार्यरत आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सुद्धा मूळचे तमिळनाडूचे आहेत. दरम्यान, त्यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून घोषणा झाली आहे..MPKV Controversy: बनावट कागदपत्रांची तक्रार करणाऱ्या प्राध्यापकाचीच चौकशी.प्रा. सरवण यांनी १२ ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी करत कुलगुरुपदासाठी nodalofficer.mpkv@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज मागविले आहेत. कुलगुरुपदासाठी संस्था किंवा समतुल्य व्यक्तीदेखील उमेदवारांचे नामांकन करू शकतात. दरम्यान, विद्यापीठातील एका विभागप्रमुखाने सांगितले, की कुलगुरू शोध व निवड समितीचे अध्यक्ष व सदस्यांची नावे अद्याप कळालेली नाहीत. ही नावे गोपनीय ठेवल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कुलगुरुपदासाठी विभागप्रमुख किंवा समकक्ष पदावरील तीन वर्षे प्रशासकीय कामाचा व प्राध्यापकपदी दहा वर्षांचा अनुभव ही अट पूर्वीप्रमाणेच बंधनकारक असेल, असे त्यांनी सांगितले..एका माजी कुलगुरूंनी मात्र लॉबिंग करून पदांच्या अर्हतेचे निकष बदलल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्याकडे लक्ष वेधले. ‘‘कृषी विभागात पदे मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा असते. तसेच, इच्छुक अधिकारी प्रसंगी पदाची अर्हता देखील बदलवून आणतात. कृषी विद्यापीठांमध्येही हीच स्थिती आहे. वर्षानुवर्षे कुलगुरुपदासाठी विभागप्रमुख पदाचा पाच वर्षांचा अनुभव बंधनकारक होता. मात्र, चार वर्षांपूर्वी एका विभागप्रमुखाने लॉबिंग केल्यामुळे अनुभव पात्रता तीन वर्षांची करण्यात आली. कुलगुरुपदासाठी सेवाज्येष्ठता हा एकमेव निकष नाही. ऐनवेळी परराज्यातील व्यक्तीचीही निवड होऊ शकते,’’ असे ते म्हणाले..अर्ज पाठविण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंतकुलगुरुपदासाठी अर्ज पाठविण्याची मुदत १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज आपोआप अवैध ठरतील, अशी माहिती सूत्रांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.