Onion Disease : कांदा पिकातील ‘बेसल रॉट’

Onion Basal Rot Disease : राज्यातील कांदा पिकांत गुलाबी करपा, स्टेमफायलम करपा व पिळ्या रोग हे महत्त्वाचे रोग आढळून येतात. परंतु या वर्षी निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या ठिकाणी एका नवीन रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे.
Onion Disease
Onion DiseaseAgrowon

राहुल वडघुले

Onion Crop Disease : राज्यातील कांदा पिकांत गुलाबी करपा, स्टेमफायलम करपा व पिळ्या रोग हे महत्त्वाचे रोग आढळून येतात. परंतु या वर्षी निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या ठिकाणी एका नवीन रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी याचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कांदा लागवडीमध्ये काळजीपूर्वक निरिक्षण करून या रोगाची ओळख पटविणे आवश्यक आहे.

रोगाची माहिती :

रोगाचे नाव : ओनिअन बेसल रॉट.

रोगाचा प्रादुर्भाव बुरशी व निमॅटोड या दोघांमुळे होतो.

लागण होण्याचा अवधी : यावर्षी मुख्य शेतात ६० दिवसानंतर हा रोग दिसून येत आहे.

रोगकारक जिवाणू :

बुरशी- फ्युझॅरिअम ऑक्सिस्पोरम (Fusarium oxysporum)

निमॅटोड : निमॅटोड स्पे. (Meloidogyne spp. Or Ditylenchus dipsaci)

यजमान पिके ः लसूण, मिरची, वांगी, टोमॅटो.

रोगाच्या प्रादुर्भावामुळे ४० ते ५० टक्के नुकसान होऊ शकते.

Onion Disease
Onion Disease : कांदा पिकातील पिळया रोग

रोग कसा निर्माण होतो :

बुरशी व निमॅटोडची लागण ही जमिनीतून होते. जमिनीचे तापमान जर १५ ते ३५ अंश सेल्सिअस इतके असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. जमिनीतील कीटक जसे की हुमणी, वायर वर्म यांच्या प्रादुर्भावामुळे तसेच खत टाकतेवेळी कांद्याला खतामुळे काही जखम झाल्यास किंवा निमॅटोड मुळे या रोगाची वाढ होते. मायक्रोस्कोप खाली या बुरशीचे बीजाणू व निमॅटोड खालील प्रमाणे पाहून रोग निश्चिती करू शकतो.

Onion Disease
Onion Disease : कांद्यावरील जांभळा करपा

लक्षणे :

कांदा पिकामध्ये बाहेरील बाजूस असलेली पाने पिवळी पडतात. त्यानंतर आतमधील पाने पिवळी पडतात.

नवीन येणारे मधले पान पिवळे पडून सुकते तसेच सडल्याप्रमाणे दिसते.

पानांवर काही ठिकाणी डिंक निघाल्यासारखी लक्षणे दिसून येतात.

पिळ्या रोगात ज्याप्रमाणे कांद्याची मान लांब व निमुळती होते, काहीशी तशीच लक्षणे यामध्येही दिसतात.

कांदा नरम होतो व नंतर सडतो. मुळांची वाढ कमी होते आणि कांदा पटकन जमिनीतून उपटला जातो.

मुळावर तपकिरी रंगाचे पॅटर्न दिसून येतात. मुळाच्या वरच्या बाजूला पांढरट रंगाची वाढ झालेली दिसते.

कांदा उभा कापला तर आत मधील भाग तपकिरी रंगाचा सडलेला दिसतो.

इतर रोगांप्रमाणे पानांवर कोणत्याही प्रकारचे ठिपके दिसून येत नाहीत.

नियंत्रणाचे उपाय :

पिकाचे सतत निरीक्षण करावे.

जैविक बुरशीनाशके जसे की ट्रायकोडर्मा व्हिरीडी (Trichoderma viride) व पॅसिलोमायसिस लिलासीनस (Paecilomyces lilacinus) या मित्र बुरशीचा वापर पीक लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणीच्या स्वरूपात करावा. शेणखतात या जैविक बुरशीचा वापर करावा.

लागवडीपूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.

कांदा लागवडीच्या अगोदर यजमान पिके जसे की लसूण, मिरची, टोमॅटो यांची लागवड करणे टाळावे.

जमिनीतून इजा करणारे कीटक जसे की हुमणी, वायर वर्म यांचे नियंत्रण करावे.

खताचा वापर करताना रोपांना व कांद्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com