Onion Disease : कांदा पिकातील पिळया रोग

Onion Twister Disease : कांदा पिकात पिळया (Twister Disease) हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे. सन २०२० पासून तो आपल्याकडे प्रकर्षाने दिसून येतो. मुख्यतः: खरिपात त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. परंतु या वर्षी डिसेंबरमध्येही तो आढळून आला होता.
Onion Disease
Onion DiseaseAgrowon
Published on
Updated on

Onion Crop : दा पिकात पिळया (Twister Disease) हा अतिशय महत्त्वाचा रोग आहे. सन २०२० पासून तो आपल्याकडे प्रकर्षाने दिसून येतो. मुख्यतः: खरिपात त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. परंतु या वर्षी डिसेंबरमध्येही तो आढळून आला होता.

रोगासंबंधी

-हा बुरशीजन्य रोग आहे. रोपवाटिकेपासून ते मुख्य शेतात तो दिसून येतो. भारतासह उष्ण व समशितोष्ण वातावरण असलेल्या अन्य देशांतही तो आढळतो.
-रोग निर्माण करणारी बुरशी: कोलेट्रोटीकम ग्लोईओस्पोरिओईद्स (Colletotrichum
gloeosporioides)
-अन्य यजमान पिके- लसूण, मिरची, आंबा, लिंबू, पपई , वांगी.
-८० ते १०० टक्के नुकसान होऊ शकते.

लक्षणे
रोपवाटिकेत आणि मुख्य शेतात रोपे खाली पडलेली दिसून येतात. कांद्याची पात
पिळलेली, स्प्रिंगसारखी गोल झाल्यासारखी दिसते. पाने पिवळी पडतात. मान लांब होते. कांदा निमुळता व सडलेला किंवा नरम झालेला दिसतो. रोपांची मुळे आखूड होतात. पातीवर मध्यभागी किंवा खालील बाजूस लंब गोलाकार पांढरट चट्टा दिसतो. रोगाच्या वाढीच्या अवस्थेत चट्ट्यांवर काळ्या रंगाचे बीजाणू दिसू लागतात.

Onion Disease
Onion Pest Disease Management : कांदा पिकातील रोग, किडींचे व्यवस्थापन

रोग कसा निर्माण होतो

ही बुरशी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, पिकांचे अवशेष, जुन्या कांद्याचा ढीग व सडणाऱ्या पदार्थांवर जिवंत राहते. ८० ते ९० टक्के आर्द्रता, २३ ते ३० अंश से. तापमानात बुरशीचे बीजाणू (अस्कोस्पोअर्स) तयार होतात. बीजाणू हवा, पाणी, कीटक व मजूर यांच्या करवी कांदा पिकावर प्रसारित होतात. आर्द्रता जास्त असेल व पान ओले रहात असेल किंवा वातावरणात दव असेल तर बीजाणू अंकुरित होऊन रोगाची लागण करतात. याला प्रथम लागण असे म्हणतात. नंतर पानावरील बुरशी बीजाणू निर्माण करते. त्यापासून पुढील प्रादुर्भाव होतो. त्याला द्वितीय लागण म्हणतात.
पोटॅशयुक्त खते जास्त वापरल्याने किंवा वाढ रोधक संजीवके वापरल्याने रोग आटोक्यात येतो हा गैरसमज आहे. तथापि शास्त्रज्ञांसोबत याविषयी अधिक चर्चा करावी. तसेच Fusarium oxysporum नावाची बुरशी व Meloidogyne या सूत्रकृमीमुळेही छायाचित्रात दर्शविल्याप्रमाणे लक्षणे दिसतात. त्यामुळे रोगाची व्यवस्थित ओळख करून घ्यावी.

नियंत्रण उपाय

-पावसाळी वातावरणात रोपे रोगग्रस्त दिसताहेत का याचे वारंवार निरिक्षण करावे. बुरशीमध्ये जी बुरशीनाशके वा त्यांच्या गटाप्रति प्रतिकारक्षमता विकसित झाली आहे अशांचा वापर टाळावा.
उदा. स्ट्रोबिल्युरीन व बेन्झीमिडाझोल गट.
-काडी कचरा, जुन्या पिकांचे अवशेष यांच्यापासून शेत स्वच्छ करावे.
-ट्रायकोडर्मा या मित्रबुरशीचा वापर लागवडीपूर्वी संपूर्ण शेतात फवारणी किंवा धुरळणीच्या स्वरूपात किंवा शेणखतातूनही करावा.
-पुर्नलागवडी पूर्वी रोपे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावीत.
-वारंवार एकाच पीक घेणे टाळावे.
-लसूण, मिरची, टोमॅटो आदी यजमान पिके कांदा लागवडीआधी घेणे टाळावे.
-रोगास अनुकूल वातावरण असेल तर शिफारस केलेले संपर्कजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा.
--रोगाची लक्षणे दिसत असल्यास शिफारस केलेल्या आंतरप्रवाही व संपर्कजन्य बुरशीनाशकांचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com