Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर, धरणांतून विसर्गात वाढ
Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. प्रामुख्याने घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. १८) सकाळी आठ वाजेपर्यंत मुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ७० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.