E peek pahani Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : साताऱ्यात ई-पीक नोंदणीत अडचणींचा डोंगर

Crop Registration : ई-पीकपाहणी नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे. मात्र, मोबाईलवरून ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Karad News : ई-पीकपाहणी नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झाली आहे. मात्र, मोबाईलवरून ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदवताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची अडचण आहे. मोबाईलला नेटवर्क आले, तर सर्व्हर चालत नाही. त्यामुळे भरलेली माहिती अपलोड होत नाही.

एकेका नोंदणीसाठी दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही फॉर्म अपलोड होत नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी नोंदणीस प्रतिसादही कमी मिळत आहे. परिणामी, मुदतीत नोंदणी करण्याचे आव्हानच शेतकऱ्यांपुढे असणार आहे.

शेतकऱ्यांना थेट बांधावरून आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाची नोंद ॲपच्या माध्यमातून करावी लागते. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंद आता बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या वर्षात ज्यांनी ई-पीकपाहणी केली त्यांनाच नुकसानीचे अनुदान दिले गेले. ज्यांनी तेव्हा ई-पीकपाहणी केली, अशांचीच निवड केलेली यादी गावोगावी लावण्यात आली. ई-पीकपाहणी नसलेले शेतकरी त्यातून वगळण्यात आले.

ई-पीकपाहणी न केलेल्यांचाही किमान या मदतीसाठी समावेश करावा, अशी मागणीही करण्यात आले. मात्र, सरकारकडून त्यावर निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या पीक पाहणी नोंदीचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे आता या नोंदीसाठी शेतकरी आता पुढे आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील १७०० गावातील नऊ लाख नऊ हजार ५६९ शेतकरी आहेत. त्यांना ही नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकरी दोन आठवड्यांपासून प्रयत्न करत आहेत. मात्र, जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण दुर्गम-डोंगराळ भागात अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने अडचणी येत आहेत.

मोबाईलला नेटवर्क आले, तर सर्व्हर चालत नाही. त्यामुळे भरलेली माहिती अपलोड होत नाही. एकेका नोंदणीसाठी दोन-तीन दिवस प्रयत्न करूनही फॉर्म अपलोड होत नाही. त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. त्यामुळे ई-पीकपाहणी नोंदणीस प्रतिसादही कमी मिळत आहे. नोंद करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीत नोंदणी करण्याचे आव्हानच शेतकऱ्यांपुढे असणार

आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT