E Peek Pahani : नेटवर्कमुळे पीक पाहणीच्या नोंदीपासून शेतकरी वंचित

Crop Insurance : पुणे जिल्ह्यातील स्थिती, नोंदी ऑफलाइन करण्याची शेतकऱ्यांची मागणी
E Peek Pahani
E Peek Pahani Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : ई-पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे. मात्र, अॅपद्वारे नोंदी करताना नेटवर्कच्या समस्येमुळे अधिक पिकांची नोंद घेतली जात नसल्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे नोंदी होण्यासाठी वेळ लागत असल्याने अनेक शेतकरी या नोंदीपासून वंचित राहत असल्याची शेतकरी तक्रारी करीत आहेत. या नोंदी ऑफलाइन कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे. अनेक शेतकरी स्वतः आपल्या मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी करीत आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांनी अजूनही या नोंदी केलेल्या नसल्याचे दिसून येते. गेल्या २०२३ मध्ये १३ सप्टेंबरपर्यंत अवघ्या २४ हजार ९२० खातेदारांनी २४ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर पीकपाहणी केली होती. परंतु ग्रामीण भागात इंटरनेटमुळे सर्व्हरमध्ये अडचणी येत असल्यामुळे अनेक शेतकरी नोंदी टाळत आहेत.
आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक पाहणीच्या नोंदी केल्या आहेत. पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्याच्या दृष्टीने ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. पीकविमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उर्वरित खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

E Peek Pahani
E-Peek Pahani : ई-पीक पाहणीत दीड कोटी शेतकरी सहभागाची शक्यता

शिरूर तालुक्यातील खैरेनगर येथील रघुनाथ शिंदे म्हणाले, की माझ्याकडे ५० एकर शेतीत विविध पिके घेतली जातात. या पिकांच्या नोंदणी करण्यासाठी अॅपमध्ये अडचणी येत आहेत. अनेकवेळा सर्व्हर डाऊन असल्याने जवळपास ७०-८० टक्के लोकांनी पीक पाहणीची नोंद केलेली नाही. सरकारने नोंद कशी करावी याचे महसूल अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यानंतर नोंदी करणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षांपासून तलाठी कार्यालयात जाऊन पीकपाहणी नोंदणी करावी लागत आहे. त्यासाठी अनेक वेळा जाऊन बसावे लागते. तसेच पीक विम्यासाठी अडचणी येत असून स्वयंघोषणापत्र भरून दिले आहे. त्यानंतर पीकविमा काढला जातो.


सध्या माझ्याकडे मूग, बाजरी, सोयाबीन अशी पिके आहेत. गेल्या वर्षी मी ई-पाहणीची नोंद केली होती. त्यामुळे फारशी अडचण आली नाही. आता पीक पाहणीच्या नोंदी या सक्तीच्या केल्या आहेत. मात्र, या नोंदी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असून पोर्टल बंद असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
- भाऊसाहेब पळसकर,
प्रगतिशील शेतकरी, कर्डे, ता. शिरूर


शेतकऱ्याकडे एक किंवा दोन पिके असतील तर त्याची ई-पीक पाहणी वेळेत होते. परंतु एका गटनंबरमध्ये वेगवेगळी पिके असतील तर अॅपमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. आमच्याकडे द्राक्षे, आंबा, सीताफळ, सोयाबीन, शेवगा, ऊस, मिरची अशी पिके आहेत. परंतु अजून पीक पाहणी नोंद केलेली नाही. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही पीक पाहणीची नोंदणी करण्यात येणार आहे.
- रघुनाथ शिंदे, प्रगतिशील शेतकरी, खैरेनगर, शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com