Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : सत्ता द्या, शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver : राज्यात प्रचारसभांचा धुरळा उडत असतानाच महायुतीसह महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आश्वासनांचा धुरळा देखील उडवला जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जावरून घोषणा केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू, अशी घोषणा केली आहे. ते चंद्रपूर येथील महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शनिवारी (ता.९) बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार फॅग्गनसिंग कुलेस्ती यांची उपस्थिती होती.

यावेळी फडणवीस यांनी, लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर टीका करताना, काँग्रेस सत्तेत आली तर राज्यातील योजना बंद पाडेल. लाडकी बहीण योजना बंद करेल, असा दावा केला. तर आमचे सरकार आल्यास सध्याच्या रक्कमेत वाढ करू, लाडक्या बहिणींना २१०० रूपये देऊ, असे आश्वासन दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केले. त्यांनी जनतेनं सत्ता दिल्यास आम्ही बळीराजाची संपूर्ण कर्जमाफी करू, असे म्हटले आहे. तसेच फडणवीस यांनी, या व्यतिरिक्त एमएसपी पेक्षा शेतमालास भाव कमी मिळाल्यास भावांतर योजना राबवू. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करू, अशी घोषणा केली आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने काँग्रेस नेते राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रासाठी पाच गॅरंटी दिली होती. यावेळी शरद पवार यांनी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य केलं होते. राज्यात ‘महाविकास आघाडी’चे सरकार आल्यास ३ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतील, त्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान दिलं जाईल”, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले होते.

यानंतर आता महायुतीने पुढचे पाऊल टाकत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू अशी घोषणा केली आहे. यामुळे शेतकरी आता कोणाच्या आश्वासनांकडे लक्ष देवून मतदान करते? महायुती की महाविकास आघाडी कोणाचे सरकार येते ते आता २३ नोव्हेंबरलाच उघड होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Development Project : सहवीजनिर्मिती प्रकल्प फायदेशीर

Supreme Court Order : शरद पवार यांचे फोटो, व्हिडिओ वापरू नका

Rabi Sowing : रब्बीच्या २९ टक्के पेरण्या

Bird Species : वायंगणीत पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळल्या

Silk Industry Loan : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

SCROLL FOR NEXT