Saint Sheikh Muhammad Maharaj  Agrowon
ॲग्रो विशेष

Saint Sheikh Muhammad Maharaj Palkhi : संत शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे आठ जुलैला प्रस्थान

Sheikh Muhammad Maharaj Palkhi ceremony : हिंदू-मुस्लिम एक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या संत शिरोमणी शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी ८ जुलैला श्री क्षेत्र वाहिरा (ता. आष्टी) येथून प्रस्थान होईल.

Team Agrowon

Nagar News : हिंदू-मुस्लिम एक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या संत शिरोमणी शेख महंमद महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी ८ जुलैला श्री क्षेत्र वाहिरा (ता. आष्टी) येथून प्रस्थान होईल.

आमदार सुरेश धस, बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे यांच्यासह वारकरी या वेळी उपस्थित राहतील. पालखी सोहळ्याचे समन्वयक सोमनाथ महाराज मेटे यांनी ही माहिती दिली. यंदा वारी मार्गावर लावणार एक हजार झाडे लावण्याचा संकल्पही करण्यात आला आहे.

नगर- बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाहिरा (ता. आष्टी) येथे संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचे जन्मगाव आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी महमंद महाराजांनी हिंदू- मुस्लिम सलोखा ठेवला. श्रींगोंदा (जि. नगर) येथे त्यांची समाधी आहे. महाराजांनी श्वेत ध्वजाची दिंडी पंढरपूरमध्ये नेण्याची परंपरा सुरू केली होती. मात्र दरम्यानच्या काळात ही परंपरा खंडित झाली. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानद्वारे गतवर्षापासून हा पालखी सोहळा नव्या जोमाने पूर्ववत सुरू केला आहे.

या पालखी सोहळ्यात वाहिरा, बोडखा, घोंगडेवाडी, खुंटफळ, कुंभेफळ, पुंडी, मेहकरी, पिंपळगाव, बेलगाव, नगरसह विविध गावांतील वारकरी सहभागी होतात. वारी मार्गावर भजन, कीर्तन, भारुड आदींसह समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सहसचिव सोमनाथ शेलार यांनी केले आहे.

वातावरणातील तापमान वाढ आणि बदल लक्षात घेता झाडे लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे काम आपल्या पिढीला करावे लागणार आहे. हे वास्तव लक्षात घेऊन प्रतिष्ठानतर्फे वृक्ष लागवड उपक्रमास चालना दिली जाणार आहे. त्यासाठी पालखी मार्गावर, अन्नदाते आणि भाविकांच्या घराजवळ, बांधावर झाडे लागवडीचा प्रयोग केला जाणार आहे. याकामी श्रमदान मंडळ, मिरजगाव येथील स्वयंसेवक सहभागी होतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT