Agriculture Department : कृषी संजीवनी सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Krishi Sanjivani : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा कृषी विभागामार्फत जागर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon
Published on
Updated on

Nanded News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, तो समृद्ध व्हावा यासाठी ता. २५ जून ते १ जुलै या कालावधीत जिल्ह्यात कृषी संजीवनी सप्ताह साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी या वर्षी पिकांची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा कृषी विभागामार्फत जागर करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

Department Of Agriculture
Agriculture Department : नऊ तालुके कृषी अधिकाऱ्यांविनाच

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ता. एक जुलै हा दिवस ‘कृषी दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात राज्यभर साजरा करण्यात येतो. २०२३-२४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य उत्पादन वाढीसोबतच लोकांच्या आहारामध्ये याचा वापर वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

या सोबतच खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत. या सप्ताहात गावांमध्ये सूक्ष्म नियोजन, गाव बैठका, शिवार भेटींचे व शेतीशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Department Of Agriculture
Agriculture Department : कृषिसेवकांची दोन हजार ७० पदे भरण्याचा प्रस्ताव

विविध गावांत कृषिविषयक राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना कृषितज्ज्ञांच्या निवडक शेतकऱ्यांसह भेटी दिल्या जाणार आहेत. कृषिविषयक मोफत सल्ला, एम किसान पोर्टलवर शेतकरी नोंदणी, शेतकरी मासिकाचे वर्गणीदार वाढविण्याची मोहीम, विविध पीक स्पर्धा आणि पुरस्काराबाबत प्रचार- प्रसिद्धी, जलयुक्त शिवार अभियान, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, मागेल त्याला शेततळे याबाबतच्या यशोगाथा आदींबाबत या सप्ताहात भर राहील, असे नमूद केले आहे.

जलसंधारणाबाबत जनजागृती

रुंद सरी, वरंबा यंत्र वापराची व पेरणीची प्रात्याक्षिके, बिजप्रक्रिया, कडधान्य आंतरपिकाबाबत मार्गदर्शन, बहुपीक पद्धतीचा प्रसार, एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेबाबत, हायड्रोफोनिक्स, हिरावा चारा निर्मिती, बी- बियाणे, खते, औषधे खरेदी व वापर करताना घ्यावयाची काळजी, फळबाग लागवड कार्यक्रम, मूलस्थानी जलसंधारणाबाबत जनजागृती व मार्गदर्शन व अल्पकालीन पीक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com