Palkhi Sohala 2024
Palkhi Sohala 2024 Agrowon

Palkhi Sohala 2024 : श्रींच्या पालखीचे पंढरीकडे १३ जून रोजी प्रस्थान

Pandharpur Yatra : अखंडितपणे पंढरपूर यात्रोत्सवात सहभागी होण्याचे ५५ वे वर्ष

Shegaon News : मागील ५४ वर्षांपासून अखंडितपणे पंढरीला जात असलेला संत गजानन महाराज पालखी सोहळा यंदाही होत आहे. ५५ व्या वर्षी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी श्रींची पालखी शुक्रवारी (१३ जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

श्रींच्या पालखीसमवेत ६०० च्या वर वारकऱ्यांसह, अश्‍वांसह टाळकरी, वारकरी, पताकाधारी, श्रीहरिनामाच्या व टाळ-मृदंगांच्या गजरात ‘जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल,’ ‘जय गजानन श्री गजानन,’ ‘गण गण गणात बोते' मंत्राचा जप करीत वारकरी संतनगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करतील.

तब्बल ३३ दिवसांचा पायी प्रवास आणि ७२५ किलोमीटरचे अंतर कापून श्रींची पालखी १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरला पोहोचेल. त्यानंतर पंढरपूरच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत श्रींच्या पालखीचा मुक्काम १५ ते २० जुलैपर्यंत राहील. श्रींची पालखी २१ जुलै श्री क्षेत्र पंढरपूर येथून रवाना होईल. दहा ऑगस्ट रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर ही पालखी ११ ऑगस्ट रोजी संतनगरी शेगावी पोहोचेल.

Palkhi Sohala 2024
Palkhi Sohla 2024 : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे २९ जूनला प्रस्थान

१३ जून रोजी श्री क्षेत्र नागझरी येथील संत गोमाजी महाराज संस्थानमध्ये महाप्रसादानंतर सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पारस येथे श्रींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम राहील. १४ जूनला पारस येथून गायगाव येथे, तर रात्री भौरद येथे श्रींच्या पालखीचा मुक्काम राहील. त्यानंतर अकोला येथे १५ व १६ जून असे दोन दिवस मुक्काम राहील.

१७ जून रोजी सकाळी भरतपूर-वाडेगाव, १८ ला देऊळगाव (बाभूळगाव)-पातूर, १९ ला मेडशी-श्री क्षेत्र डव्हा, २० ला मालेगाव- शिरपूर जैन, २१ ला चिंचापा पेन-म्हसला पेन, २२ ला किनखेडा-रिसोड, २३ रोजी पानकन्हेरगाव-सेनगाव, २४ रोजी श्री क्षेत्र नरसी (नामदेव) - डिग्रस, २५ रोजी श्री क्षेत्र औंढा नागनाथ-जवळा बाजार, २६ रोजी हट्टा (अडगाव रंजोबा) श्री क्षेत्र त्रिधारा, २७ रोजी परभणी- परभणी, २८ जून ब्राह्मणगाव दैठणा, २९ ला खळी - गंगाखेड, तर ३० जूनला वडगाव (दादा हरी) परळी (थर्मल) येथे मुक्काम असेल.

दरम्यान, १ जुलै रोजी परळी- परळी वैजनाथ, २ ला कन्हेरवाडी- अंबाजोगाई, ३ रोजी लोखंडी सावरगाव - बोरी/सावरगाव, ४ रोजी गोटेगाव - कळंब, ५ ला गोविंदपूर - तेरणा, सा. कारखाना, ६ ला किनी - उपळा (माकडाचे), ७ ला श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिर, धाराशिव, ८ ला वडगाव सिद्धेश्‍वर-श्री क्षेत्र तुळजापूर, ९ ला सांगवी ऊळे, १० रोजी सोलापूर, ११ रोजी सोलापूर, १२ रोजी तिन्हे, १३ ला कामती खु. (वाघोली) माचणूर, १४ रोजी ब्रह्मपुरी, श्री क्षेत्र मंगळवेढा, १५ रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा व रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी पोहोचेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com