Paddy Farming Demonstration Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation Demonstration : मोखाड्यात यांत्रिक पद्धतीने भातलावणीचे प्रात्यक्षिक

Team Agrowon

Palghar News : मोखाड्यात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. त्यामध्ये बदल करून आरोहण संस्थेने कृषी दिनानिमित्त तुळयाचा पाडा येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक घेतले आहे. कमी खर्चात भातरोपे तयार करणे आणि त्यानंतर यांत्रिक पद्धतीने लावणीचा यशस्वी प्रयोग मोखाड्यात करण्यात आला आहे. यासाठी आरोहण संस्थेने पुढाकार घेतला आहे.

आरोहण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा तालुक्यामध्ये वासिंद आणि पोशेरा येथे दोन अवजार बँक स्थापन करण्यात आल्या आहेत. येथील आदिवासी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. या अवजार बँकेत बैलचलीत चिखलनी यंत्र, भात लावणी यंत्र, ग्रास कटर, पॉवर ट्रेलर अशी अवजारे आहेत.

सर्वसाधारण मोखाडा, जव्हार, विक्रमगड या तालुक्यांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच भात रोपे आणि लावणी करण्यात येते. यासाठी तुळयाचा पाडा येथे यांत्रिक पद्धतीने भातलागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. येथील सरपंच देवीदास निसाळ, मोखाडा पंचायत समिती सदस्या लक्ष्मी भुसारे, नितेश मुकणे, आरोहणचे कार्यकर्ते, गटाचे सदस्य उपस्थित होते.

पारंपरिक-यांत्रिक पद्धतीमधील फरक

पारंपरिक पद्धतीने एकरी भातक्षेत्र लागवड करण्यासाठी २५ ते ३० मनुष्यबळ आणि आठ ते १० हजार रुपये खर्च येतो. तेच यंत्राच्या साह्याने एकरी भातलागवड करण्यासाठी एक तास १५ मिनिटे वेळ आणि दोन हजार रुपये खर्च येतो.

पारंपरिक पद्धतीत नर्सरी बनवण्यासाठी किचकट आणि वेळखाऊ राब प्रक्रिया करावी लागते. या तुलनेत आधुनिक पद्धतीत चटई पद्धतीने नर्सरी बनवली जाते. या पद्धतीने मोखाडा तालुक्यातून एकूण ३० शेतकऱ्यांकडे सूर्यमाळ, कोशिमशेत, मोऱ्हांडा, खोच, बेरीस्ते, कारेगाव, पोशेरा, मोखाडा, डोल्हारा येथे भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत.

कमी पैशांत जास्त उत्पन्न

यंत्राच्या साह्याने भात लागवड केल्यास वेळ, श्रम, पैसा यांची बचत होणार आहे. कमी पैशांत जास्त उत्पन्न कसे मिळेल, हे या मागचे उद्दिष्ट आहे. या लागवडीनंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात परिसरातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. भविष्यात शेतकऱ्यांना ही पद्धत यामुळे समजणे सोपी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

SCROLL FOR NEXT