Crop Demonstration : दोन हजार हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके

Agriculture Updates : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे.
Crop Demonstration
Crop Demonstration Agrowon
Published on
Updated on

Alibaug News : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात दोन हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायकांशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्‍वला बाणखेले यांनी केले.

२०२३-२४ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात हरभरापीक १ हजार ७५ हेक्टर व मुग ९६५ हेक्टर असे एकूण २ हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकाचे नियोजन करण्यात आले आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Crop Demonstration
E-Peak Pahani : पीक विम्यासाठी ई-पीक पाहणी कराच; समजून घ्या प्रक्रिया

याकरिता राष्ट्रीय बीज निगम लिमिटेड तसेच महाबीज यांच्यामार्फत हरभरा बियाणे ८९२.५ क्विंटल व मूग बियाणे १४४.७५ क्विंटल असे २,२४० हेक्टर कडधान्य पीक प्रात्यक्षिक क्षेत्रासाठी १,०३७.२५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.

Crop Demonstration
Crop Insurance : पीक विम्याची २५ टक्के अग्रिम भरपाई अखेर मिळणार

आठवडाभरात कापणी पूर्ण होणार

रसायनी : वडगाव, आपटे, चावणे, गुळसुंदे, वासांबे मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक घेतात. यंदा सुरुवातीला भातपिकाला निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला.

त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. सध्या भातपीक तरारले असूनकापणीची लगबग सुरू आहे. पुढील आठवडाभरात सर्वत्र कापणीचे कामसुरू होतील, असे कृषी मित्र सुदाम कडपे यांनी सांगितले. तर ठिकाणी कापणी पूर्ण होऊन झोडणीची कामे सुरू झाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com