Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Drought Crisis : लोकसभेच्या निवडणुकीच्या वातावरणात शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या, शेतकरी दुष्काळात होरपळत आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : लोकसभेच्या निवडणुकीच्या वातावरणात शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या, शेतकरी दुष्काळात होरपळत आहेत. इंदापूर तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ठोस निर्णय घ्यावेत. तसेच इंदापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, मुलांची फी माफ करावी, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावोगावी चारा छावणी काढावी.

गावोगावी पाण्याचे टँकर सुरू करावेत यासाठी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने इंदापूर तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले. तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता खरात म्हणाल्या, की सध्या राजकीय वातावरण गरम झाले आहे; परंतु त्याचवेळी माझ्या शेतकऱ्यांचेही हाल सुरू आहेत. विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे.

पिके जळत आहेत. जनावरे व माणसांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. आणखी चार-आठ दिवसांनी पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागेल. माझी शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून आपण शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे.

इंदापूर तालुका दुष्काळी जाहीर करून दुष्काळातील सर्व उपाययोजना तालुक्यातील प्रत्येक गावागावात लागू कराव्यात. इंदापूर तालुक्याच्या बाजूने जाणाऱ्या नीरा नदीला चिमणीला पिण्यासाठीही पाणी नाही. उजनीही मायनसमध्ये गेले आहे, तसेच थोड्याफार बोअरना, विहिरींना असणारे पाणी तळाला गेले आहे.

याचा विचार करून शासनाने त्वरित हा विषय मार्गी लावावा. शेतकऱ्यांना जी दोन आवर्तने देण्याचे ठरले, त्यावर लवकरात लवकर विचार करून पाणी सोडावे. राज्य सरकारने राजकारणाबरोबर शेतकऱ्यांवरही लक्ष केंद्रित करावे या सर्व गोष्टींसाठी आज इंदापूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

या वेळी तेजपृथ्वीच्या अध्यक्षा खरात, सद्दाम बागवान, लक्ष्मण वाघमोडे, संदीप रेडके, गणेश शिंगाडे, रूपेश वाघमोडे, ओंकार पेंडावळे, नारायण हरणावळ, आबा देवकर, तानाजी हेगडकर यांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT