Drought Update : टंचाई उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

Water Scarcity : राज्य शासनाने टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी.
Drought
Drought Agrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यात पाणी व चाराटंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने टंचाईच्या उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा माहे जून २०२४ अखेरपर्यंत करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (ता. ५) केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्याच्या टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहआयुक्त पूनम मेहता, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा आदी उपस्थित होते.

Drought
Water Scarcity : सांगली जिल्ह्यात ७५ टँकरने पाणीपुरवठा सुरू

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, की राज्य शासनाने टंचाई जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये विविध सवलती जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही याची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी. टंचाई सदृश गावात चारा व पाणी उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करावे.

Drought
Water Scarcity : पाणीटंचाईचे अर्थकारण

पाणीपुरवठा योजनेसाठी विशेष दुरुस्ती प्रस्ताव सादर करत असताना ही कामे तत्काळ पूर्ण करून घ्यावीत. तसेच कामांचा दर्जा उत्कृष्ट असेल याची खात्री करावी. जिल्ह्यात असलेल्या १६ शासकीय टँकरपैकी १२ टँकरला वाहनचालक उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. तरी या शासकीय टँकरसाठी मानधन तत्त्वावर अथवा शासनाने विहित केलेल्या पद्धतीनुसार वाहन चालक उपलब्ध करून घ्यावेत, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सूचित केले.

परजिल्ह्यांत चारा वाहतुकीस बंदी

जिल्हा नियोजन समितीमध्ये चार कोटी पन्नास लाख रुपयांचे चारा बियाणे खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला उपलब्ध करून दिलेले असून, यातून बियाणे खरेदी करून ज्वारी, बाजरा व मका चारा उपलब्ध होत असून जुलै २०२४ अखेरपर्यंत जिल्ह्यात चारा उपलब्ध राहणार आहे. तसेच जिल्हा बाहेर चारा घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, अशी ही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com