Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement : ‘नाफेड’कांदा खरेदीची चौकशी करण्याची मागणी

Statement of Bharatiya Kisan Sangh : नाफेडच्या माध्यमातून उन्हाळ कांद्याऐवजी लाल कांदा पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,

Team Agrowon

Nashik News : नाफेडच्या माध्यमातून उन्हाळ कांद्याऐवजी लाल कांदा पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांचे अतोनात नुकसान होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, की नाफेड व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सहा महिन्यांपूर्वी रब्बी उन्हाळ कांदा खरेदी करण्यात आला. आता केंद्र शासनाने कांदादर नियंत्रणासाठी नाफेडच्या माध्यमातून विविध ठिकाणी कांदा टंचाई असल्याने पाठविण्याचा निर्णय घेतला; मात्र प्रत्यक्षात उन्हाळ कांद्याऐवजी बाजार समितीमधून अत्यंत निकृष्ट दर्जाचा लाल कांदा खरेदी करून उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रँकच्या माध्यमातून कांदा पाठविला जात आहे.

नित्कृष्ट दर्जाच्या कांद्यामुळे तेथील बाजारभावात घसरण झाली. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे कांदा बाजारभाव कमी झाल्याने अतोनात नुकसान होत आहे व ग्राहकांना सुद्धा तेथे निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करावा लागत आहे.

यामध्ये संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्या आणि नाफेड यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली आहे व आजही कांदा पाठविण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

त्या सर्व बाबींचा विचार करता जून ते ऑगस्ट या काळात सुमारे तीन लाख टन कांदा कुठल्या कुठल्या कंपनीने खरेदी केला. त्यापैकी किती कांदा पाठविला व आज रोजी किती कांदा शिल्लक आहे, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शासनाची, शेतकरी व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी. निकृष्ट दर्जाचा कांदा पाठविणाऱ्यांची चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT