Onion Procurement : ‘नाफेड’ कांदा खरेदी भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांची मुस्कटबाजी

NAFED : ग्राहकांसाठी कांद्याची रास्त दरात उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी केली.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : ग्राहकांसाठी कांद्याची रास्त दरात उपलब्धता होण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी केली. हा कांदा सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने देशभरात वितरित केला जात आहे.

मात्र उन्हाळऐवजी दुय्यम दर्जाचा लाल कांदा बाजारात पाठविला जात असल्याचे गंभीर प्रकार गुरुवारी (ता.५) सामाजिक कार्यकर्ते गोरख संत व किरण सानप यांनी उघडकीस आणला. भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर, त्यांच्यावर दबाव टाकून रेल्वे पोलिस बळाद्वारे गुन्हा नोंद करण्याचे सांगून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

Onion
NCCF Onion Purchase : ‘एनसीसीएफ’ कांदा खरेदी, विक्रीसंबंधी गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न

याबाबत सविस्तर माहिती अशी, ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ने खरेदी केलेला कांदा जिल्ह्यातून देशातील विविध शहरांमध्ये पाठवला जात आहे. उन्हाळ कांद्याची खरेदी झाल्याने तोच कांदा पुरवठा होणे अपेक्षित असताना लाल खरीप कांदा पाठवला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याची पोलखोल संत व सानप यांनी प्रत्यक्ष रेल्वे स्थानकावर जाऊन केली.

यापूर्वी सडलेला व खराब कांदा पाठविल्याचे संत यांनी उघडकीस आणले होते. आता याच अनुषंगाने भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी ते दोघेही गुरुवारी (ता.५) लासलगाव रेल्वे स्थानकावर कांद्याची बोगी भरत असताना सायंकाळी ६ च्या सुमारास पोहोचले. त्या वेळी खरीप लाल कांदा पाठविला जात असल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेचे चित्रीकरण त्यांनी स्वतः केले. या वेळी व्यापाऱ्यांच्या संबंधित काही व्यक्तींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

Onion
Onion Purchase : कांदा खरेदीतील संभ्रम करा दूर

‘हे व्हिडिओ डिलिट करा,’ असे सांगत त्यांच्यावर दबाव टाकला. दरम्यान, अंधार पडल्यामुळे जोखीम नको म्हणून दोघे तेथून निघून गेले. संत यांना स्थानिक रेल्वे पोलिस प्रतिनिधींनी पोलिस स्टेशनमध्ये नेत गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखविला. मात्र ‘मी शेतकरी हितासाठी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे, यात काय गैर केले,’ असा युक्तिवाद संत यांनी केला. अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाह

शासनाच्या तिजोरीतून लूट होत असताना भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्यांवर दबाव टाकून मुस्कटदाबी होत आहे. व्यापाऱ्यांनी मलिदा खाल्ला आहे. मात्र याकडे डोळेझाक होत आहे.
गोरख संत, सामाजिक कार्यकर्ता

आता पुरावे आहेत कारवाई होणार का?

गोरख संत यांनी यापूर्वी ‘नाफेड’ कांदा खरेदी भ्रष्टाचारासंबंधी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय सतर्कता आयोग व कृषी मंत्रालयाला याबाबत सूचित केल्यानंतर त्यानंतर ‘नाफेड’च्या पश्चिम विभागीय व्यवस्थापक विमा कुमारी यांनी याबाबत संत यांना पिंपळगाव बसवंत कार्यालयात बोलावून चौकशी केली होती. त्यावेळी ‘पुरावे द्या, तरच आम्ही पुढे बघू’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. संत यांनी पोलखोल केली. त्यांच्याकडे पुरावेही आहेत. नाफेड आता याबाबत गांभीर्याने घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com