Daund Sugar Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation Policy: दौंड शुगरचे ऊस लागवड धोरण जाहीर

Director Veerdhawal Jagdale: दौंड शुगर कारखान्याने २०२५-२६ लागवड हंगाम जाहीर केला असून, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली ऊस लागवड व खोडवा पिकाचे धोरण ठरवले आहे, अशी माहिती संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Deulgaon Raje: दौंड शुगर कारखान्याकडून लागवड हंगाम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी कारखान्यामार्फत लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांचे मार्गदर्शनाखाली ऊस लागवड व खोडवा पिकाबाबत लागवड धोरण जाहीर करण्यात आल्याची माहिती दौंड शुगर संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

आडसाली १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत को ८६०३२, कोएम ०२६५, फुले १५०१२ पूर्व हंगामी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर को ८६०३२, कोएम ०२६५, व्हिएसआय ०८००५, कोसी ६७१, फुले १५०१२, कोव्हीएसआय १८१२१, फुले १३००७, फुले १५००६, १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर को ८६०३२, कोएम ०२६५, व्हिएसआय ०८००५, व्हीएसआय ४३४, कोसी ६७१, एमएस १०००१, फुले १५०१२,

कोव्हीएसआय १८१२१ फुले १३००७, फुले १५००६ सुरू १ डिसेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ को ८६०३२, कोएम ०२६५, व्हीएसआय ०८००५, व्हिएसआय ४३४, कोसी ६७१, एमएस १०००१, फुले १५०१२, कोव्हीएसआय १८१२१ फुले १३००७, फुले १५००६ खोडवा २८ फेब्रुवारी २०२६ अखेर तुटलेल्या उसाचा खोडवा को ८६०३२, कोएम ०२६५, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ४३४, कोसी ६७१, एमएस १०००१, फुले १५०१२, कोव्हीएसआय १८१२१ फुले १३००७, फुले १५००६.

जूनमध्ये २०२५ मध्ये जे शेतकरी ऊस लागण करतील त्यांच्या लागणीची नोंद १ जुलै रोजी घेण्यात येईल.कारखान्यामार्फत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत. ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढ अभियान हा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येईल.

शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके, सहलीचे आयोजन ऊस शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळांवे, विविध प्रात्यक्षिकांचे व सहलीचे आयोजन कारखान्यामार्फत करण्यात येईल.

रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके, विद्राव्य खते, जैविक खते वाटप ना नफा ना तोटा या तत्त्वांवर विविध कंपन्यांची रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची विद्राव्य खते तसेच व्हीएसआयची द्रवरूप जैविक खते कारखाना कृषी सेवा केंद्रामार्फत रोखीने उपलब्ध करण्यात येत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

Nepal Protest: नेपाळचे पंतप्रधान ओली, राष्ट्रपती पौडेल यांचा राजीनामा

Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी’चा हप्ता ९१.६५ लाख शेतकऱ्यांना वितरित

Agriculture Growth: काळदरी परिसरात पिके बहरली

SCROLL FOR NEXT