ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : दत्त साखर कारखाना मागील गळीत हंगामातील १०० प्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देणार

Sugarcane Installment : मागील हंगामातील (सन २०२२-२३) शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये ३ हजार पेक्षा कमी दिलेला आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Season : गळीत हंगाम २०२२- २३ मधील अतिरिक्त उसदर १०० रूपये प्रमाणे दसऱ्याच्या पूर्वी श्री. दत्त कारखान्याच्या सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात अदा करीत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांच्याकडून प्रस्ताव मान्यतेनंतर लगेचच ही कारवाही करीत असल्याचे त्यांनी शनिवार (ता.१०) प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.

पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी/ खाजगी साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये यासंदर्भात झालेल्या चर्चेमध्ये मागील हंगामातील (सन २०२२-२३) शेतकऱ्यांना ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रति मेट्रिक टन रुपये ३ हजार पेक्षा कमी दिलेला आहे. त्यांनी रुपये १०० व ज्या साखर कारखान्यांनी उसाचा दर प्रतिमेट्रिक टन रुपये ३ हजार पेक्षा जादा दिलेला आहे. त्यांनी रुपये ५० अतिरिक्त देणे बाबत निश्चित केले होते.

याबाबतचा अतिरिक्त ऊस दराचा प्रस्ताव साखर कारखान्यांनी शासनाकडे तात्काळ सादर करावा व पुढील दोन महिन्यात त्यास मान्यता देण्याचे आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिले होते. तसेच दोन महिन्यानंतर वरील प्रमाणे अतिरिक्त उसदराची रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याने आपला प्रस्ताव दिनांक ०८ डिसेंबर २०२३ रोजी शासनास सादर केला होता.

त्याप्रमाणे प्रति मेट्रिक टनास १०० रुपये प्रमाणे अतिरिक्त ऊस दर दत्त कारखाना दसऱ्याच्या पूर्वी शेतकऱ्यांना देणार आहे. दत्त कारखान्याने आतापर्यंत शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही शेतकरी हिताला प्राधान्य देवून काम करण्याची आमची भूमिका कायम ठेवणार असल्याचे गणपतराव पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT