NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

Chetan Narake Kolhapur : शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पंजाब कोल्हापूरमध्ये आणायचे होते. या प्रयत्नाला एनडीबीच्या माध्यमातून यश आले आहे.
NDDB Dairy Services Kolhapur
NDDB Dairy Services Kolhapuragrowon
Published on
Updated on

NDDB Dairy Services & Gokul Milk Kolhapur : एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) यांच्या माध्यमातून राबवला जाणारा प्रकल्प ०५ ऑक्टोबर नंतर सुरू होईल अशी माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे.

एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस आणि कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) च्या माध्यमातून जिल्ह्यातील केर्ली (ता. करवीर) गोठा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. परराज्यातील 'मुऱ्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' अशा म्हशी कोल्हापुरातच दूध उत्पादकांना खरेदी करता येणार आहेत. गुरुवार (ता.०३) पासून जनावरांची खरेदी-विक्री सुरू होणार होती, परंतु एनडीडीबी डेअरी आणि गोकुळ दूध संघ यांच्यात ०५ ऑक्टोबरला म्हशींच्या दराबाबत बैठक होणार आहे. यानंतरच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती डोंगळे यांनी दिली.

गोकुळ अध्यक्ष डोंगळे म्हणाले की, ५ तारखेला एनडीडीबीच्या अधिकाऱ्यांसोबत सोबत मिटींग होणार आहे. कमी दूध देणाऱ्या म्हशीला किती दर असावा तसेच जास्त दर देणाऱ्या म्हशीला किती दर असावा याबाबत दर निश्चितीसाठी गोकुळ आणि एनडीडीबी यांच्यात बैठक घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा कल जास्त दूध देणाऱ्या म्हशीकडे असतो यामुळे कमी दूध देणारी म्हैस प्रकल्पात राहण्याची शक्यता आहे. दराची निश्चिती करूनच हा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी दिली.

पंजाब कोल्हापुरात आणण्याचे स्वप्न पूर्ण : चेतन नरके

शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी पंजाब कोल्हापूरमध्ये आणायचे होते. या प्रयत्नाला एनडीबीच्या माध्यमातून यश आले आहे. दूध उत्पादकांना म्हशी अनुदानाचे पैसे प्रवास खर्चात वाया न जाता जनावर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग होणार आहे. याचबरोबर आरोग्य प्रमाणपत्र व डीएनए विश्लेषण मिळाल्यास विमा कंपन्यांच्या १५ दिवसांच्या जाचक अटीचा रद्द करण्यास मदत होईल वर शेतकऱ्यांला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य व गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके दिली.

NDDB Dairy Services Kolhapur
Milk Rate Issue : अनुदानाची कुबडी नको, तर कष्टाचा दर द्या

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी प्रकल्प

कोल्हापूर जिल्ह्यात दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने येथे म्हशी आणि गाईंची खरेदी विक्रीही तितक्याच प्रमाणात होत असते. गोकुळच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. यामध्ये शेतकरी परराज्यातून म्हशी खरेदी करत असतात परंतु परराज्यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढल्याने कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ)च्या माध्यमातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकाराने दूध उत्पादकांसाठी कोल्हापुरातच 'मुऱ्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' म्हशी मिळणार आहेत.

म्हशींसाठीचा पहिला गोठा प्रकल्प

कोल्हापूर जिल्हा दूध संघ आणि जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आल्याने शेतकरी जातिवंत म्हशींच्या खरेदीसाठी गुजरात, हरयाणा, पंजाब येथे जाऊन जनावरे खरेदी करत असतात. यातून कोल्हापूर जिल्ह्यात एक हजाराहून अधिक म्हशी खरेदी करण्यात आल्या आहेत. पण, शेतकऱ्यांची फसवणूक थांबून खात्रीशीर म्हैस मिळावी, यासाठी 'एनडीडीबी'ने पुढाकार घेतल्याने जातिवंत म्हशी कोल्हापुरातच मिळणार आहेत. यापूर्वी 'वारणा' येथे गायींसाठी गोठा करण्यात आला होता. पण म्हशींसाठीचा महाराष्ट्रातील पहिला गोठा केर्लीत होत आहे.

तज्ज्ञांची टीम

एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेसकडून जातीवंत म्हशी खरेदी करण्यासाठी तज्ज्ञांची टीम तयार करण्यात आली आहे. हे तज्ज्ञ पंजाब येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यावर जाऊन जातिवंत म्हशी खरेदी करणार आहेत. म्हशींच्या आरोग्य तपासण्या व लसीकरण करून कोल्हापुरात आणल्या जातील तसेच जो शेतकरी 'एनडीडीबी' कडून म्हैस खरेदी करणार आहे त्या शेतकऱ्याला संबंधित म्हशीचे आरोग्यकार्ड शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये त्या जनावराचे वय, ती कितव्या वेताची आहे. लसीकरण केले आहे का नाही, निरोगी असल्याचे प्रमाणपत्र आदी माहिती दिली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com