Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Rahul Gandhi Kolhapur Visit : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon
Published on
Updated on

kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारा संविधानाला अनुसरून आहे. पण आज देशात जे सत्तेत बसले आहेत. ते देशातील नागरिकांना धमकावून संविधानाची भाषा करत आहेत. शिवाजी महाराज यांचे दर्शन घ्यायचं आणि सत्तेत बसून नागरिकांना वेठीस धरायचं काम सध्या सुरू असल्याचे स्पष्ट मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते.

राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना याच विचारधारेनं त्यांच्या राज्याभिषेधकाला विरोध केला होता, त्याविरोधात महाराज लढत होते. त्यांची नियत नीट नव्हती म्हणून त्यांच्या हातातून अनावरण झालेला पुतळा कोसळला, असा टोला त्यांनी नाव न घेता भाजपला लगावला. त्यांनीच राम मंदिर, संसदेत ‌आदिवासी राष्ट्रपतींना उद्घाटनाला बोलावलं नाही. हीच यांची विचारधारा आहे.

Rahul Gandhi
Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी वाशीममध्ये तर राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल

मूर्ती ज्यांची बनते त्यांच्या विचाराचं आपण समर्थन करतो. महाराज सर्वांना बरोबर घेऊन जात होते. देश सर्वांचा आहे हे त्यांचे विचार होते. २१ व्या शतकातही तेच विचार आपल्या संविधानात आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Rahul Gandhi
Rahul Gandhi Kolhapur : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर आता राहुल गांधी येणार कोल्हापुरात

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यांचा राज्याभिषेक करण्यास एका विशिष्ट विचारधारेनं नकार दिला. त्याच विचारधारेशी आपण आता लढत आहोत. आपली लढाई त्या विचारधारेशी असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मागच्या काही महिन्यात महाराष्ट्रात शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ज्यांच्या कामामुळे पडला त्यांनी पुढच्या वेळी पुतळा उभारला, तर चांगल्या विचारानं उभारावा, मात्र तुम्ही चुकीच्या विचारधारेनं पुतळा उभारला. त्यामुळे तो पुतळा कोसळला," असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com