Nilwande Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Nilwande Dam : निळवंडेचे अतिरिक्त पाणी कालव्याला सोडा

Agriculture Irrigation : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू असून निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोट परिसरात यंदा मे आणि जून महिन्यांपासून पाऊस सुरू असून निळवंडे आणि भंडारदरा धरणांमध्ये पाण्याची समाधानकारक उपलब्धता झालेली आहे.

परिणामी या धरणांतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग नदीमार्गे मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने डाव्या व उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक समाधानकारक आहे. त्यामुळे नदी मार्गे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. मात्र दुसरीकडे निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र हे पर्जन्य छायेखाली येते, त्यामुळे अद्यापही लाभक्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला नाही.

लाभक्षेत्रात शेतीसाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या कायम आहे. हा विरोधाभास लक्षात घेता, निळवंडे धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून तातडीने सोडणे अत्यावश्यक आहे. या दुष्काळी पट्ट्यात आताच पाणी सोडले तर ते पाणी अडवले जाईल, जिरवले जाईल आणि त्यातून बरेच क्षेत्र सिंचनाखाली येऊन वर्षभर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.

त्यामुळे निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्काळ डाव्या आणि उजव्या दोनही कालव्यांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मागील दोन वर्षांपासून कालव्यांमधून पाणी सोडावे अशी मागणी माजी मंत्री थोरात यांनी केली होती. त्यानंतर प्रशासनाने दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला होता, असे पत्रात नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ethanol Policy : इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळतो; केंद्रीय मंत्री जोशींचा दावा

Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांसाठी ५७४ कोटींची मागणी

Kunbi community wedding reforms : साध्या लग्नसोहळ्याचा कुणबी बांधवांकडून आदर्श

Agriculture : अमेरिकेचे फूड बास्केट असलेल्या ‘या’ राज्यासोबत महाराष्ट्राचा करार, कृषीसह विविध क्षेत्रात एकत्र काम करणार

Farmers Protest : उद्योगांच्या नावाखाली सुपीक जमिनींची नासाडी

SCROLL FOR NEXT