Chandrapur News: खरीप हंगामात ऐन पेरणीवेळी शेतकऱ्यांना खते मिळत नव्हते. अशावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खत कंपन्या, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत शेतकरी बांधवांसाठी खते उपलब्ध करून दिले. .मात्र आता अनेक कृषी केंद्र चालक युरिया सोबत इतर खतांच्या लिंकिंगचा आग्रह करीत आहेत. हा प्रकार अन्यायकारक आहे. असा प्रकार शेतकऱ्यांसोबत घडत असल्यास त्यांनी संबंधितांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन भाजपचे किसान मोर्चाचे अध्यक्ष बंडू गौरकार यांनी केले आहे. .Fertilizer Dealers Issue: निविष्ठा विक्रेत्यांना आरोपीच्या यादीतून कायमचे वगळा.श्री. गौरकार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या युरिया खरेदीवर कोणत्याही प्रकारचे लिंकिंग करू नये. शेतकरी बांधवांना विनाअडथळा व त्यांच्या गरजेनुसार युरिया खत मिळाले पाहिजे.शेतकऱ्यांना त्रास देण्याचा, अन्याय करण्याचा किंवा अडथळा आणण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही..Fertilizer Linking Complaint: आरसीएफच्या विरोधात लिकिंगप्रकरणी तक्रार.श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे आज जिल्ह्यात खताची कमतरता दूर झाली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या खत वितरणात गैरव्यवस्था होऊ नये, यासाठी किसान मोर्चा सतत लक्ष ठेवून आहे. .योग्य पद्धतीने खते मिळाले पाहिजे, हे आमचे ठाम धोरण आहे. जर या बाबत कोणावरही अन्याय होत असेल तर तातडीने आपापल्या तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याची तक्रार करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.