निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?टॅरिफ, वाढत्या भू- राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरुप बदललेभारताचे ८ टक्के जीडीपी वाढीचे लक्ष्य कायमभारताकडे बाह्य धक्क्यांचा सामना करण्याची मजबूत क्षमता.India GDP growth : टॅरिफ, वाढत्या भू- राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे स्वरुप बदलत आहे. तरीसुद्धा भारताने ८ टक्के जीडीपी वाढ (देशाच्या आर्थिक विकासाचा दर) साध्य करण्याचे लक्ष्य कायम ठेवले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.."विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला ८ टक्के जीडीपी वाढीचा वेग गाठावा लागेल. २०४७ पर्यंत आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून विकसित भारत बनवणे म्हणजे याचा अर्थ आपण बंदिस्त अर्थव्यवस्था बनू असा नाही. आपण एका अभूतपूर्व जागतिक अस्थिरतेच्या युगात आहोत. तरीही, भारताकडे बाह्य धक्क्यांचा सामना करण्याची मजबूत क्षमता आहे" असे त्या पुढे म्हणाल्या. त्या कौटिल्य आर्थिक संमेलन २०२५ च्या उद्घघाटन कार्यक्रमात बोलत होत्या..De-oiled Rice Bran Exports: केंद्र सरकारने अडीच वर्षांनंतर 'डी-ऑइल्ड राईस ब्रॅन'वरील निर्यात बंदी उठवली.''२०४७ पर्यंत भारताचे लक्ष्य विकसित भारत बनण्याचे आहे आणि त्यासाठी ८ टक्के जीडीपी दर गाठणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय, विकसित भारत बनण्यासाठी आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला जगापासून वेगळे ठेवायचे आहे. आम्हाला एक बंदिस्त अर्थव्यवस्था बनायचे नाही. जगात सध्या असामान्य अस्थिरता आहे. पण भारत बाह्य धक्क्यांचा सामना करु शकतो,'' असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला..जगभरात भू-राजकीय तणाव वाढत आहेत. टॅरिफ, निर्बंध यासारख्या निर्णयांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत आहे. ही परिस्थिती भारतासाठी आव्हान आणि संधी अशा दोन्ही घेऊन येत आहे. भारताला देशांतर्गत विकासासोबतच जागतिक सहकार्य कायम ठेवायचे आहे. जागतिक अनिश्चिततेतही देशाचा विकास दर कायम ठेवणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्या म्हणाल्या..Farmer Relief Maharashtra : वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी?; मुख्यमंत्री फडणवीस २ दिवसांत मोठी घोषणा करणार.WTO, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबाबत काय म्हणाल्या सीतारामन?जागतिक स्तरावरील संस्था कमकुवत होत असून त्यांना बळकटी देण्याच्या महत्त्वावरही त्यांनी जोर दिला. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सारख्या जागतिक संस्था कमकुवत होत आहेत. यामुळे जागतिक आत्मविश्वास कमी होत चालला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीत स्थिरता आणण्यासाठी या संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जग सध्या एका ऐतिहासिक वळणावर असून आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक कमी होत चालली आहे. गुंतवणूक आणि विकास यांच्यात सतत संघर्ष असतो, असेही त्यांनी नमूद केले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.